धर्म भयानक टॉपिक, भगवान कृष्णाने माझ्यावर…, आमिर खानचं लक्षवेधी वक्तव्य
Aqamir Khan on Religion: धर्माबद्दल बोलायला का घाबरतो आमिर खान? म्हणाला, 'धर्म भयानक टॉपिक, भगवान कृष्णाने माझ्यावर...', अभिनेत्याच्या लक्षवेधी वक्तव्याची सर्वत्र चर्चा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा...

Aamir Khan on Religion: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान याचा ‘सितारे जमीन पर’ सिनेमा प्रदर्शित झाला असून अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात नुकताच अभिनेत्याला धर्माबद्दल विचारण्यात आलं. अभिनेत्याने धर्माला ‘डेन्जरस टॉपिक’ असं म्हणत मी सर्व धर्माचा आदर सन्मान करतो… असं सांगत मोठ्या पडद्यावर मला भगवान कृष्ण यांची भूमिका साकारायला आवडेल असं सांगितलं.
नुकताच झालेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, ‘जेव्हा मी लोकांना भेटको तेव्हा मी धर्म विचारत नाही. मी फक्त व्यक्ती पाहतो. धर्म प्रचंड भयानक टॉपिक आहे आणि धर्माबद्दल सर्वांसमोर बोलणं मी कायम टाळतो. प्रत्येक व्यक्तीसाठी धर्म खासगी विषय आहे. मी सर्व धर्मांच्या लोकांचा आणि त्यांच्या धार्मिक मार्गाचा आदर करतो.’
‘भगवान कृष्णाने माझ्यावर प्रभाव पाडला आहे’
आमिरने असंही सांगितले की तो गुरु नानकांच्या शिकवणींनी खूप प्रेरित आहे आणि त्याच्या गुरूंपैकी एक आहे सुचेता भट्टाचार्य ज्यांच्याकडून त्याने खूप काही शिकलं आहे. दरम्यान, आमिरने पडद्यावर भगवान कृष्णाची भूमिका साकारण्याची इच्छाही व्यक्त केली.
View this post on Instagram
आमिर खान म्हणाला, ‘भगवान कृष्णाने माझ्यावर प्रभाव पाडला आहे, ते शब्दांत सांगणं फार कठीण आहे. हे एक फार खोल दर्शन आहे. त्यांच्या कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, भगवद्गीता आपल्याला त्यांच्याबद्दल सांगते. कृष्ण एक परिपूर्ण व्यक्ती आहे. मला त्यांच्याबद्दल असंच वाटतं.”
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मोठ्या पडद्यावर मला कृष्णाची भूमिका साकारायची आहे. पाहूया हे शक्य आहे का?’, यावर लवकरच काम सुरू होईल असेही आमिरने म्हटलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा रंगली आहे.
ओटीटीवर नाही प्रदर्शित होणार ‘सितारे जमीन पर…’
आमिर खान स्टारर ‘सितारे जमीन पर’ सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 20 जून रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 109 कोटींची कमाई केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आमिर खान याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने अनेक ओटीटी दिग्गजांकडून आलेल्या कोट्यवधींच्या ऑफर देखील नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
