शेफालीचं धक्कादायक निधन, पोलिसांच्या तपासात 5 गोष्टी समोर, तिसरी अत्यंत धक्कादायक
Shefali Jariwala Death Reason: शेफाली जरीवाला हिच्या निधनाने सर्वत्र खळबळ, अभिनेत्रीच्या निधनाबद्दल 5 धक्कादायक गोष्टी समोर, शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आल्यानंतर अभिनेत्रीच्या निधनाचं नेमकं कारण समोर येईल...

Shefali Jariwala Death Reason: अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी रात्री निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीचं अचानक निधन झाल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नियमीत जीम, योगा करून देखील शेफालीचं निधन झाल्यामुळे अनेकांना अभिनेत्रीचं निधन नक्की कशामुळे झालं असेल असा प्रश्न पडला. शेफाली मृत्यू प्रकरणी सध्या कसून तपास सुरु आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कार्डित अरेस्टमुळे अभिनेत्रीचं निधन झालं आहे. पण शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आल्यानंतर अभिनेत्रीच्या निधनाचं नेमकं कारण समोर येईल.
फॉरेन्सिक टीम मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आता पोलिस अहवालात नवीन माहिती मिळाली आहे. अतुल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काही गोष्टी उघड केल्या आहेत. अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वृद्धत्वविरोधी घेत होती औषधे
27 जून रोजी घरी पूजा होती ज्यामुळे शेफालीने उपवास ठेवला होता. तरीही तिने दुपारी तिला वृद्धत्वविरोधी औषध इंजेक्शन घेतले होते. तिने 5-6 वर्षांपूर्वी डॉक्टरांकडून वृद्धत्वविरोधी आणि व्हिटॅमिन औषधे घेतली होती, आतापर्यंतच्या तपासात, हृदयविकाराच्या झटक्याचे हे एक प्रमुख कारण असल्याचे समोर आलं आहे.
मृत्यूच्या काही काळापूर्वी काय घडले
रात्री 10 – 11 च्या सुमारास अचानक अभिनेत्रीचं शरीर थरथर कापू लागले आणि ती खाली पडली, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी शेफाली, तिचा पती पराग आणि शेफालीची आई यांच्यासह घरात काही इतर लोक उपस्थित होते.
घटनास्थळी आढळली औषधे
एफएसएल टीमने शेफालीच्या घरातून अनेक औषधं जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये अँटी-एजिंग व्हाईल्स, जीवनसत्त्वे आणि गॅस्ट्रिक गोळ्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी नोंदवले जबाब
आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये कुटुंबातील सदस्य, नोकर आणि हॉस्पिटलचे डॉक्टर यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या तपासात वादग्रस्त कारण समोर आलेलं नाही.
