‘कांटा लगा’ गर्लचं जबरदस्त ट्रान्सफॉरमेशन, अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

Kaanta laga girl Shefali Jariwala: 'कांटा लगा' गर्लचं जबरदस्त ट्रान्सफॉरमेशन..., सौंदर्य वाढवण्यासाठी करते लिप फिलर आणि बोटॉक्स?, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शेफाली जरिवाला हिच्या सौंदर्याची चर्चा...

'कांटा लगा' गर्लचं जबरदस्त ट्रान्सफॉरमेशन, अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 3:34 PM

‘कांटा लगा’ हे गाणं तुमच्या आजही लक्षात असले. अभिनेत्री शेफाली जरिवाला हिने ‘कांटा लगा’ गाण्यावर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही कोणत्या कार्यक्रमात ‘कांटा लगा’ गाण्यावर चाहते ताल धरतात. पण ‘कांटा लगा गर्ल’ आता काय करते? कशी दिसते? असा प्रश्न देखील अनेकांना पडला. 2003 मध्ये ‘कांटा लगा गाणं’ प्रदर्शित झालं होतं. तेव्हा शेफाली हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आपल्या भन्नाट डान्स आणि घायाळ अदांनी शेफालाने चाहच्यांच्या मनात घर केलं. आजही अभिनेत्री कायम चर्चेत असते. शेफालीने छोट्या पडद्यावर देखील तुफान कामगिरी केली. बिग बॉसमध्ये शेफालीने तिच्या खास अंदाजात चाहत्यांच लक्ष वेधलं.

शेफाली जरिवाला आता जाहिराती, कार्यक्रमाच्या माध्यमातून कमाई करते. आता शेफाली हिला पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल. वयाच्या 41 व्या वर्षी देखील शेफालीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत शेफाली हिने स्वतःमध्ये झालेल्या ट्रान्सफॉरमेशनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री स्वतःला आणखी सुंदर करण्यासाठी लिप फिलर्स आणि बोटॉक्स केलं आहे. ही पूर्ण प्रक्रिया प्रचंड त्रासदायक असते. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

शेफाली म्हणाली, ‘लिप फिलर्स आणि बोटॉक्स आजच्या घडीला प्रत्येक जण करत आहे. ज्यामुळे व्यक्तीचं सौंदर्य आणखी वाढतं आणि यामध्ये काहीही चुकीचं नाही. ही प्रक्रिया फार त्रासदायक असते. मी पहिल्यापासून माझ्या सौंदर्याची काळजी घेतली आहे. मी लिप फिलर आणि बोटॉक्स केलं आहे की नाही… हे मी सांगू शकत नाही. पण केल्यानंतर तुमचं सौंदर्य नक्की वाढेल एवढं मी सांगू शकते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

शेफाली जरिवाली हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शेफाली हिने अभिनेता पराग त्यागी याच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. शेफाली कायम पराग याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. शेफाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर शेफालीचे 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर अभिनेत्री फक्त 160 लोकांना फॉलो करते. सोशल मीडियावर शेफाली हिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?
प्रितमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडेंनी काय दिले संकेत?.
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....