‘यांना घर नाही का?’; एअरपोर्टवर लिपलॉक केल्याने ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री ट्रोल

अभिनेत्री शेफाली जरीवाला आणि तिचा पती पराग त्यागी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केलंय. एअरपोर्टवर लिपलॉक केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

यांना घर नाही का?; एअरपोर्टवर लिपलॉक केल्याने कांटा लगा फेम अभिनेत्री ट्रोल
शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 25, 2025 | 9:22 AM

‘कांटा लगा’ या गाण्यामुळे अभिनेत्री शेफारी जरीवाला आजही प्रसिद्ध आहे. शेफालीचं हे गाणं इतकं गाजलं, की आजसुद्धा ती त्यामुळे ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. शेफाली सध्या अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग असून त्यावर ती स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शेफाली अनेकदा तिच्या बोल्ड अंदाजामुळेही चर्चेत असते. नुकताच तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ती पती पराग त्यागीसोबत एअरपोर्टवर रोमँटिक होताना दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी या दोघांचा लिपलॉक करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शेफालीचा पतीसोबतचा हा रोमँटिक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अल्पावधीच हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून काहींनी टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये पराग आणि शेफाली लिपलॉक करताना दिसून येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटींनी अशा गोष्टी करणं टाळावं, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी हे सर्व करण्याची काय गरज’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तुम्हाला घर नाही का?’, असाही सवाल दुसऱ्याने केला. ‘अशी कृत्ये करून ही लोकं भारतीय संस्कृती खराब करत आहेत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

शेफाली आणि पराग हे लग्नाआधी बरीच वर्षे एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर 2014 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. त्याआधी 2004 मध्ये शेफालीने हरमीत सिंहशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 2009 मध्ये शेफाली आणि हरमीत विभक्त झाले. शेफाली आणि परागने बाळासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. याविषयी एका पॉडकास्ट मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या आणि परागच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी आई होऊ शकली नाही. गर्भधारणेत मला बऱ्याच समस्या आल्या. आम्ही दोघांनी बाळासाठी सर्व प्रयत्न केले. आता असं वाटतं जे आमच्या नशिबात असेल ते होईल.”