Kabir Bedi : वयाच्या 70व्या वर्षी 29 वर्षांनी लहान मुलीसोबत थाटला संसार, लेक झालेली नाराज; वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला प्रसिद्ध अभिनेता
Bollywood Actor : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला. अभिनेत्यानं वयाच्या 70व्या वर्षी 29 वर्षांनी लहान मुलीसोबत लग्न केलेलं.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. त्यांचं काही अभिनेत्रींसोबत अफेअरही होतं आणि त्यांनी चार लग्न केली. मात्र, वयाच्या 70व्या वर्षी स्वतःपेक्षा 29 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत चौथं लग्न केल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांच्या या निर्णयामुळे मुलगी पूजा बेदीही नाराज झाली होती.
कबीर बेदी यांनी 1969 मध्ये ओडिसी नृत्यांगना प्रतिमा बेदी यांच्याशी पहिलं लग्न केलं. या लग्नातून त्यांना पूजा बेदी ही मुलगी आणि सिद्धार्थ हा मुलगा अशी दोन मुलं झाली. मात्र, काही काळानंतर कबीर बेदी आणि अभिनेत्री परवीन बाबी यांच्यात जवळीक वाढू लागली. त्यामुळे कबीर आणि प्रतिमा यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कबीर यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर काही काळानं प्रतिमा यांचं निधन झालं. प्रतिमा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर कबीर बेदी यांच्या आयुष्यात ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रेस यांची एंट्री झाली. दोघांनी लग्न केलं, मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर कबीर यांनी दुसऱ्या पत्नीसोबतही घटस्फोट घेतला.
तिसऱ्या लग्नानंतरही घेतला घटस्फोट
दुसरं लग्न मोडल्यानंतर कबीर बेदी यांनी 1990 मध्ये टीव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर निक्की यांच्याशी तिसरं लग्न केलं. मात्र, जवळपास 15 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे कबीर यांच्या आयुष्यातील तिसरं लग्नही मोडलं.
वयाच्या 70व्या वर्षी केलं चौथं लग्न
तिसरं लग्न मोडल्यानंतरही कबीर बेदी यांनी पुन्हा प्रेमाला संधी दिली. परवीन दोसांज त्यांच्या आयुष्यात आल्या. दोघं जवळपास 10 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर कबीर यांनी त्यांच्या 70व्या वाढदिवशी म्हणजेच 16 जानेवारी 2016 रोजी परवीन यांच्याशी चौथं लग्न केलं. या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली ती दोघांच्या वयातील अंतरामुळे. परवीन दोसांज या कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी हिच्यापेक्षा साधारण तीन ते चार वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे वडिलांनी स्वतःच्या मुलीपेक्षाही लहान वयाच्या महिलेशी लग्न केल्यामुळे पूजा बेदी नाराज झाल्याचं म्हटलं जातं.