MMS लीक झालेल्या अभिनेत्रीला सीतेच्या लूकमध्ये पाहून भडकले नेटकरी, म्हणाले ‘घोर कलयुग’

'कच्चा बदाम गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली अंजली अरोरा तिच्या एका लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आगामी चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार असून त्याच रुपातील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MMS लीक झालेल्या अभिनेत्रीला सीतेच्या लूकमध्ये पाहून भडकले नेटकरी, म्हणाले घोर कलयुग
Anjali Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2025 | 10:44 AM

‘कच्चा बदाम’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली अंजली अरोरा तुम्हाला आठवतेय का? या व्हायरल व्हिडीओमुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिला कंगना राणौतच्या ‘लॉकअप’ या शोचीही ऑफर मिळाली होती. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली अंजली आता एका नवीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वादामागचं कारण म्हणजे, तिचा सीतेच्या रुपातील लूक. या लूकमधील तिचा फोटो क्षणार्धात व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्यावरून अंजलीला ट्रोलसुद्धा केलंय.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा आता म्युझिक व्हिडीओ आणि अभिनयक्षेत्रातही काम करू लागली आहे. ‘दिल पर चलाई छुरिया’ हा तिचा नुकताच प्रदर्शित झालेला म्युझिक व्हिडीओ विशेष चर्चेत होता. त्यानंतर ती ‘श्री रामायण कथा’मध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. यामध्ये ती रजनीश दुग्गल, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि देव शर्मा यांच्यासोबतत काम करणार आहे. पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटातील अंजलीचा लूक व्हायरल झाला आहे.

या फोटोमध्ये अंजली भगव्या साडीत पहायला मिळतेय. सोशल मीडियावर अंजलीची प्रतिमा एक बोल्ड इन्फ्लुएन्सर म्हणून आहे. तिचे विविध डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिले आहेत, ज्यामध्ये ती तोकडे कपडे घालून नाचताना दिसते. त्यामुळे अशा व्यक्तीला सीतेची भूमिका दिल्याने नेटकरी नाराज झाले आहेत. ‘हिला सीता बनवणं हा खूप मोठा अपमान आहे’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

इन्स्टाग्रामवर ठुमके लावणारी मुलगी सीता मातेची भूमिका साकारू शकत नाही, असं एकाने लिहिलंय. तर ‘घोर कलयुगाची सुरुवात झाली आहे. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. अंजली तिच्या एका एमएमएसमुळेही चर्चेत आली होती. त्यामुळे तिने सीतेची भूमिका साकारू नये, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. यावर अद्याप अंजलीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक सिंग करत आहे. तर प्रकाश महोबिया आणि संजय बुंदेला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

सीतेच्या भूमिकेविषयी अंजली एका मुलाखतीत म्हणाली होती, “ही भूमिका मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप नशीबवान समजते. सीतेची भूमिका इतकी पवित्र आणि पूजनीय आहे की ती कोणीच नाकारू शकत नाही. पण या भूमिकेसाठी मलाच का निवडलं, हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होते. दिग्दर्शकांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की माझ्यासोबतच त्यांनी इतर काही अभिनेत्रींना शॉर्टलिस्ट केलं होतं. मला असं वाटतं की त्यांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल, ज्यामुळे मी सीतेच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन असं त्यांना वाटलं असेल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us