AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra : आयुष्यच संपवण्याचा विचार..; जेल, घटस्फोटाच्या चर्चा अन् शिल्पाचा एक फोन, राज कुंदाचा मोठं वक्तव्य

Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तुरुंगातील अनुभव सांगितला. शिल्पा घटस्फोट देत असल्याची बातमी जेव्हा त्याला तुरुंगात असताना समजली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Raj Kundra : आयुष्यच संपवण्याचा विचार..; जेल, घटस्फोटाच्या चर्चा अन् शिल्पाचा एक फोन, राज कुंदाचा मोठं वक्तव्य
शिल्पा शेट्टी, राज कुंद्राImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2026 | 12:17 PM
Share

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. यावेळी राजच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता. राजला अटक झाल्यामुळे शिल्पा त्याला घटस्फोट देणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्रा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर राज जवळपास दोन महिने मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कैद होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

राज ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं आणि मी तिथे गेलो. मी तिथे पोहोचताच एक्सवर (ट्विटर) वाचलं की मला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मी पोलिसांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, होय हेच आदेश आहेत. शिल्पालाही बातम्यांच्या माध्यमातून माझ्या अटकेबद्दल समजलं होतं. त्यावेळी भारतात माझा बिझनेस चालत होता, ज्यामध्ये जवळपास 4000 लोक काम करत होते. मी सगळं कसं मॅनेज करू शकेन, असा प्रश्न शिल्पाला पडला होता. तर दुसरीकडे मला सांगण्यात आलं होतं की मला 63 दिवसांपर्यंत तुरुंगात रहावं लागेल. या सर्व गोष्टींमध्ये आणखी किती काळ लागेल, हे मला माहीत नव्हतं.”

“माझं डोकंच चालत नव्हतं. मी एकेदिवशी आयपीएल टीमचा मालक होतो आणि दुसऱ्याच दिवशी थेट तुरुंगात पोहोचलो. बाहेर आल्यानंतर मी पुन्हा नव्याने सुरुवात केली. पण तुरुंगातील काळ मी कधीच विसरू शकत नाही. मी कसाबसा तिथे गोष्टी मॅनेज करत होतो. त्यातच अचानक मला मीडियातून समजलं की, शिल्पा मला घटस्फोट देत आहे. हे वाचून मी इतका अस्वस्थ झालो की मला काहीच सुचत नव्हतं. मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. इतकंच काय तर मी आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. आता जगण्यात काही अर्थ नाही, असं मला वाटत होतं. कारण माझ्यासाठी माझी पत्नी आणि कुटुंब यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

दुसऱ्या दिवशी राजने फोनवर शिल्पाशी संपर्क साधला, तेव्हा त्याला घटस्फोटाच्या बातमीच काहीच तथ्य नसल्याचं समजलं. “शिल्पाने मला सांगितलं की, सर्व फालतू गोष्टी आहेत. मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्यावर माझा विश्वास आहे. त्या फोन कॉलनंतर मला खूप ताकद मिळाली. तेव्हा मी म्हटलं, माझं जितकं खच्चीकरण करायचं असेल तितकं करा.. माझी पत्नी माझ्यासोबत आहे. मला आता काहीच फरक पडत नाही”, असं राज पुढे म्हणाला.

Follow Us
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक