
अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन यांचा आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघांनी देखील अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. आज काजोल – अजय बॉलिवूडचे पॉव्हर कपल म्हणून ओळखले जातात. दोघांच्या संसाराला 25 वर्ष झाली आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा अजय – काजोल यांच्या संसारमध्ये तिसऱ्या महिलीची एन्ट्री झाली होती. अजय याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगू लागल्या होत्या. ज्या महिलेसोबत अजय याचं लग्नानंतर नाव जोडलं जात होतं, ती महिला दुसरी तुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत आहे…
अनेक मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंगना आणि अजय यांच्यातील जवळीक दिवसागणिक वाढत होती. ज्याचा त्रास काजोल हिला होऊ लागला होता. ‘वन्स अपोन ए टाइम इन मुंबई’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान कंगना – अजय यांच्यातील जवळीक वाढली होती.. असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. जेव्हा दोघांच्या नात्याचं सत्य काजोल पर्यंत पोहोचलं, तेव्हा काजोल हिने कंगना आणि अजय दोघांना देखील धमकावलं होतं.
अजय – कंगना यांच्या नात्याबद्दल माहिती होताच, काजोल हिने मुलांना घेऊन घर सोडण्याची धमकी अभिनेत्याला दिली होती. तेव्हा अजय याने देखील कंगना हिच्यासोबत काम करणं बंद केलं. एवढंच नाहीतर, काजोल हिने कंगनाला देखील धमकावलं होतं, ‘माझ्या नवऱ्यापासून दूर राहा, हेच तुझ्यासाठी चांगलं आहे…’ असं रागात काजोल म्हणाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगन याला देखील कंगना आवडू लागली होती. त्यामुळे अभिनेत्याने तेज आणि रासकल्स यांसारख्या सिनेमांमध्ये कंगना हिला कास्ट करण्यास सांगितलं होतं. कंगनाला निर्माते आणि दिग्दर्शकांचा विरोध होता. अजय देवगन याच्यामुळे कंगनाला सिनेमांमध्ये काम मिळालं. पण काजोल हिने धमकावल्यानंतर अजय याने कंगनासोबत काम करणं बंद केलं. त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तुफान चर्चेत आहे. कंगना हिने नुकतीच लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर जिंकली आहे. कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.