
बॉलिवूडमधील अनेक जोड्या या चित्रपटांच्या सेटवर बनल्या आणि त्यांनी लग्न करून आपल्या नात्याला पुढची दिशा दिली. शिवाय या जोड्या चित्रपटांप्रमाणेच खऱ्या आयुष्यात देखील तेवढ्याच हीट ठरल्या. त्यातील सर्वाची आवडती जोडी म्हणजे काजोल आणि अजय देवगण. ही जोडी जेवढी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे तेवढीच ती खऱ्या आयुष्यातही आहे. अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला आता 26 वर्षे झाली आहेत. या 26 वर्षात सुखी संसाराचे काय रहस्य आहे हे काजोलनेच सांगितले आहे.
“आम्ही खूप आधीच वेगळे झालो असतो”
एका मुलाखतीत तिने लग्न इतके दिवस टिकण्याचे कारण सांगितलं आहे. तिने म्हटलं की, ती आणि अजय एकमेकांपासून फार वेगळे आहे. “जर आम्ही इतके सारखे असतो तर इतकी वर्ष लग्न टीकलं नसतं. आम्ही खूप आधीच वेगळे झालो असतो”. काजोल पुढे म्हणाली की तिच्या आणि अजयच्या विचारसरणीत आणि उर्जेत खूप फरक आहे. हेच त्यांच्या नात्याला संतुलित ठेवते. तिने विनोदाने पुढे म्हटलं की, “आनंदी वैवाहिक जीवनाचे रहस्य म्हणजे थोडे बहिरे होणं आणि काही गोष्टी विसरणे”
“आम्ही डेट नाईट्स करत नाही”
अजय आणि काजोल यांची पहिली भेट 1995 मध्ये झाली.1997 मध्ये ‘इश्क’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची जवळीक वाढली. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी लग्न केले.
अजय आणि काजोल डेट नाईट्स करत नाहीत. एका मुलाखतीत काजोलने सांगितले होते की “आम्ही डेट नाईट्स करत नाही. आमच्याकडे फक्त कुटुंबासाठी खूप वेळ असतो. कारण अजय एकतर कामात व्यस्त असतो किंवा मी तरी प्रवासात असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही घरी सर्वांसोबत वेळ घालवतो.”
“आमच्या लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत…”
जेव्हा काजोलला विचारण्यात आले की त्यांचे नाते मित्रासारखे आहे का, तेव्हा ती म्हणाली, “आमच्या लग्नाला इतकी वर्षे झाली आहेत, आता अजयबद्दल बोलताना मी ब्लश तर करू शकत नाही”. काजोलने लग्न टिकण्यासाठी सगळं काही फिल्मी नसतं तर खऱ्या आयुष्यात समजून अन् सांभाळून घेणंच गरजेचं आहे. तसेच काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे गरजेचं आहे असं सांगण्याचा तिने प्रयत्न केला आहे.