44 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याचा शेवटचा सीन ठरला टर्निंग पॉइंट, थिएटरमध्ये सर्वच रडले, आजही त्याच सीनसाठी लोक..

141 मिनिटाचा चित्रपट, ज्याची कथा पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये ढसाढसा रडले. शेवटचा सीन ठरला प्रचंड हिट. तो सीन पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये करायचे गर्दी.

44 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याचा शेवटचा सीन ठरला टर्निंग पॉइंट, थिएटरमध्ये सर्वच रडले, आजही त्याच सीनसाठी लोक..
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 22, 2026 | 10:04 AM

Bollywood Most shocking climax Scene: हिंदी चित्रपटसृष्टीतील असा एक चित्रपट ज्याचा शेवट पाहून प्रेक्षक प्रचंड रडले. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आले होते पाणी. 141 मिनिटांच्या या चित्रपटाने रचला होता इतिहास. ठरला होता ब्लॉकबस्टर. चित्रपटाची कथा पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये करायचे गर्दी. आम्ही 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेला ‘सदमा’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट आजही हिंदी सिनेमातील सर्वात हृदयस्पर्शी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा लेखन बालू महेंद्र यांनी केले होते. मुख्य भूमिकांमध्ये कमल हासन आणि श्रीदेवी दिसले तर गुलशन ग्रोवर, सिल्क स्मिता आणि पेंटल यांसारख्या कलाकारांनी सहाय्यक भूमिका साकारल्या.

हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपट मून्द्राम पिराई याचा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट सुंदर लोकेशन्सवर चित्रित करण्यात आला होता. चित्रपटातील नायिका श्रीदेवी ही श्रीमंत कुटुंबातील मुलगी असते. एका अपघातानंतर तिची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलते आणि ती लहान मुलीसारखी वागू लागते. तिच्या हालचाली, निरागसपणा आणि बालसुलभ हावभाव इतके नैसर्गिक वाटतात की प्रेक्षकांना ती खरोखरच लहान मुलगी आहे असे भासते.

कमल हासन यांनी साकारलेला सोमू हा तिचा रक्षक बनतो. तो तिला वेश्यालयातून वाचवून आपल्या घरी आणतो. तिची काळजी घेतो, तिला जेवण देतो, कपडे घालतो आणि तिच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करतो. हळूहळू तो तिच्यावर प्रेम करू लागतो पण या नात्याची गुंतागुंत त्याला ठाऊक असते. तरीही तिच्या आनंदासाठी तो सर्वस्व अर्पण करतो. या दोघांमधील भावनिक नातं हेच या चित्रपटाचं मुख्य कारण आहे.

सुरुवातीला अपयश, नंतर कल्ट दर्जा

‘सदमा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला प्रेक्षकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. सुमारे 1.2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 2.1 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे तो व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला. मात्र समीक्षकांनी चित्रपटाचे आणि विशेषतः कमल हासन व श्रीदेवी यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. दोघांनाही फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. काळाच्या ओघात हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ ठरला. टीव्हीवर आणि नंतर ओटीटीवर प्रेक्षकांनी त्याला पुन्हा शोधून काढले. IMDb वर त्याला 8.3 अशी रेटिंग मिळाली आहे.