Bigg Boss 17 : फार उशीर होण्याआधीच..; अंकिता-विकीच्या नात्याबद्दल अभिनेत्रीकडून चिंता व्यक्त

बिग बॉसच्या घरात दररोज अंकिता आणि विकीमध्ये नवा वाद पहायला मिळतोय. एकीकडे अंकिता विकीपासून दूर गेल्याने नाराज होती, तर दुसरीकडे विकी मात्र इतरांसोबत खुश होता. हे सर्व पाहून अंकिताचा पारा चढला आणि रागाच्या भरात ती विकीला बरंवाईट बोलून गेली.

Bigg Boss 17 : फार उशीर होण्याआधीच..; अंकिता-विकीच्या नात्याबद्दल अभिनेत्रीकडून चिंता व्यक्त
Ankita Lokhande and Vicky Jain
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2023 | 11:53 AM

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. स्पर्धकांना दिले जाणारे नवनवीन टास्क आणि त्यातून लागणारा त्यांचा कस.. हे सर्व पाहून चाहत्यांचं जोरदार मनोरंजन होतंय. यासोबतच ज्या विवाहित जोड्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत, त्यांच्या नात्याचीही परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिची पती विकी जैन यांच्या नात्यासाठी दिवसेंदिवस कठीण होताना दिसतेय. सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये सतत भांडणं पहायला मिळत आहेत. त्यावर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने प्रतिक्रिया दिली आहे. अंकिताने पतीसोबत या शोमध्ये येऊन मोठी चूक केली, असं तिचं म्हणणं आहे.

बिग बॉसमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात दररोज नवीन भांडणं होत आहेत. त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. बिग बॉसच्या नादात या दोघांचं नातं तुटेल की काय, अशीही भीती चाहत्यांना सतावतेय. “तू माझा वापर केलास”, असे आरोप अंकिताने विकीवर केले होते. तर विकीसुद्धा अंकिताला अनेकदा बरंवाईट बोलून गेला. यादरम्यान आता काम्याने ट्विट करत लिहिलं की, अंकिताने या शोमध्ये आलं पाहिजे नव्हतं. इतकंच नव्हे तर तिने विकी आणि अंकिताच्या नात्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

काम्याने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘मला अंकिता खरंच आवडते पण असं वाटतंय की तिने या शोमध्ये यायला पाहिजे नव्हतं. पतीसोबत तर नक्कीच नाही. तिला आणि विकीला फार उशीर होण्याआधी हा खेळ समजू दे अशी आशा करते’, असं काम्याने लिहिलंय. काम्यासुद्धा बिग बॉसची माजी स्पर्धक आहे. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

‘बिग बॉस 17’ हा शो अंकिता लोखंडेसाठी फारच त्रासदायक ठरतोय. अंकिताचा पती विकी जैनला नुकतंच ‘दिमाग’ विभागाच्या घरात हलवलं गेलं, तर दुसरीकडे स्वत: अंकिता ‘दिल’ विभागातील घरात राहत आहे. मात्र पतीपासून झालेला हा दुरावा तिला सहन होत नाहीये. अंकिताने विकीसमोर आपल्या मनातील खदखद मोकळेपणे बोलून दाखवली. इतकंच नाही तर तिने हेसुद्धा कबूल केलं की तिने विकीला या शोमध्ये तिच्यासाठी आणि तिच्या खेळीसाठी घेऊन आली आहे. बिग बॉसच्या घरात एकटेपणा जाणवत असल्याची भावना तिने व्यक्त केली.