‘दुसऱ्या पतीलाही घटस्फोट देणार’ म्हणणाऱ्याला काम्या पंजाबीने सुनावलं; अखेर ट्रोलरने..

काम्याने 2003 मध्ये बंटी नेगीशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 10 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. 2013 मध्ये काम्याने बंटीला घटस्फोटी दिला. या दोघांना आरा ही मुलगी आहे. 2009 मध्ये काम्याने आराला जन्म दिला.

दुसऱ्या पतीलाही घटस्फोट देणार म्हणणाऱ्याला काम्या पंजाबीने सुनावलं; अखेर ट्रोलरने..
Kamya Punjabi
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2023 | 7:05 PM

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीला तिच्या दुसऱ्या लग्नावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काम्या तिचा दुसरा पती शलभ डांग यालासुद्धा घटस्फोट देईल, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. काम्याने 2003 मध्ये बंटी नेगीशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 10 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. 2013 मध्ये काम्याने बंटीला घटस्फोटी दिला. या दोघांना आरा ही मुलगी आहे. 2009 मध्ये काम्याने आराला जन्म दिला. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 मध्ये काम्याने डॉक्टर शलभ डांगशी दुसरं लग्न केलं. शलभचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून त्याला इशान हा मुलगा आहे. सध्या काम्या आणि शलभ मिळून आरा आणि इशान या दोन मुलांचा सांभाळ करत आहेत.

दुसऱ्या लग्नावरून आणि घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्याला काम्याने सडेतोड उत्तर दिलं. तिने ट्विट करत लिहिलं, ‘तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? आपल्या घाणीचं दुकान तुम्ही दुसरीकडे कुठेतरी घेऊन जा. मी कशाबद्दल बोलतेय, हेसुद्धा तुम्हाला माहीत नाही. पण तुम्हाला सर्वत्र फक्त घाणीचं साम्राज्य पसरवायचं आहे. श्वास घ्या, थोडं पाणी प्या आणि तुमच्या आईला तुम्हाला काही शिष्टाचार शिकवण्यास सांगा.’

काम्याच्या या सडेतोड उत्तरानंतर संबंधित ट्रोलरने त्याचं ट्विट डिलिट केलं. काम्याने मंगळवारी एक ट्विट केलं होतं. ‘इतिहासाची पुनरावृत्ती होईल’ असं तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं. ट्रोलरने काम्याच्या या ट्विटवर लिहिलं, ‘इतिहासाची पुनरावृत्ती होईल कारण तू तुझ्या दुसऱ्या पतीलाही घटस्फोट देणार?’ काम्या तिच्या ट्विटमधून बिग बॉस 16 बद्दल बोलत होती, असा अंदाज काहींनी वर्तवला होता.

गेल्या वर्षी एका मुलाखतीत काम्या तिच्या पतीबद्दल म्हणाली होती, “मला माझ्या पतीकडून खूप चांगली साथ मिळाली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून माझ्या आयुष्यात मला ही साथ मिळाली नव्हती. गेल्या सहा महिन्यांपासून मी काम केलं नाही या तणावाखाली मी आता झोपत नाही. लग्न केल्यापासून माझा भावनिक संघर्ष खूप कमी झाला.”

काम्याने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. रेत, अस्तित्त्व: एक प्रेम कहानी, बनू मै तेरी दुल्हन, पिया का घर, मर्यादा: लेकीन कब तक, क्यूँ होता है प्यार यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. तिने कॉमेडी सर्कसच्या दुसऱ्या सिझनमध्ये आणि बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्येही भाग घेतला होता. काम्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. कहो ना प्यार है, ना तुम जानो ना हम, यादें, फिर भी दिल है हिंदुस्तानी, कोई मिल गया या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.