डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट बंद, भडकलेल्या कंगनाचा ट्विटरच्या CEO वर निशाणा, म्हणते, ‘स्वार्थी सगळे’

| Updated on: Jan 11, 2021 | 3:45 PM

बॉलिवूडच अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते.

डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट बंद, भडकलेल्या कंगनाचा ट्विटरच्या CEO वर निशाणा, म्हणते, स्वार्थी सगळे
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. विषय कुठल्याही असो कंगना त्यावर तिचे मत दयायला मागे पुढे कधीच पाहात नाही. आता कंगनाने तिचा मोर्चा थेट ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey)कडे वळवला आहे. कंगनाने एक ट्विट करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. इस्लामिक राष्ट्रांना विकल्या जात असल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विट अकाउंट बंद केल्याने कंगनाने हा राग काढला आहे. (Kangana Ranaut did Criticism of Twitter CEO Jack Dorsey)

ट्विटरचे सीईओ यांच्या 5 वर्षापूर्वीच्या ट्विटवर कंगनाने लिहिले की, इस्लामिक राष्ट्र आणि चीनने आपल्याला पूर्णपणे विकत घेतले आहे, तुम्ही फक्त फायद्यासाठी हे सर्व करत आहेत. तुम्ही  गुलाम आहात. असे म्हणत कंगनाने आता ट्विटरचे सीईओवरच थेट निशाना साधला आहे. कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्यचे स्वत : कंगनाने सांगितले आहे आणि यूजर्सचे आभार मानले होते.

कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर होतीआहे आणि लिहिले होती की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार
अलीकडेच दिलजीतने आपल्या सुट्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, ज्यावर कंगनाने टाकले होते व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस. याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या : 

Kangana Ranaut | मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगना-रंगोलीला पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

Kangana Ranaut | कंगना रनौतच्या याचिकेवर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी

(Kangana Ranaut did Criticism of Twitter CEO Jack Dorsey)