AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | ‘त्या’ किसिंग सीननंतर अभिनेत्याच्या ओठांतून आलं रक्त? आरोपांवर कंगना म्हणाली ‘हृतिक रोशननंतर..’

‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटं बोलत असल्याचं सांगितलं होतं. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली.

Kangana Ranaut | 'त्या' किसिंग सीननंतर अभिनेत्याच्या ओठांतून आलं रक्त? आरोपांवर कंगना म्हणाली 'हृतिक रोशननंतर..'
Kangana Ranaut on kissing sceneImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 24, 2023 | 1:42 PM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एखादा राजकीय, सामाजिक मुद्दा असो किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारी एखादी पोस्ट.. कंगना त्यावर आवर्जून बिनधास्तपणे व्यक्त होते. नुकताच सोशल मीडियावर तिच्याबद्दलच्या एका वृत्ताची पोस्ट व्हायरल झाली. त्या पोस्टवर उत्तर देताना कंगनाने अभिनेता हृतिक रोशनचाही उल्लेख केला आहे. यामुळे पुन्हा एकदा कंगना आणि हृतिक यांचं नातं चर्चेत आलं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिवॉल्वर रानी’ या कंगनाच्या चित्रपटातील किसिंग सीनच्या वृत्ताबद्दलची ही पोस्ट होती.

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे वृत्त शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वृत्तात असं लिहिलं आहे की, ‘रिवॉल्वर रानी’ या चित्रपटातील किसिंग सीनदरम्यान वीर दासच्या ओठांतून रक्त येऊ लागलं होतं. कंगना आणि वीर दास यांच्यातील हा किसिंग सीन होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने लिहिलं, ‘हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची अब्रू लुटली. हे कधी झालं?’ यासोबतच तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला.

कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद जगजाहीर आहे. 2016 – 2017 मध्ये हा वाद जोरदार चर्चेत होता. इतकंच नव्हे तर कंगनाविरोधात हृतिकने कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली होती. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असलेला सगळा राग तिने या मुलाखतींमध्ये व्यक्त केला होता.

‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटं बोलत असल्याचं सांगितलं होतं. या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली. या वादात त्यावेळी अनेकांनी कंगनाची बाजू घेत हृतिकवर टीका केली होती. तर हृतिकचे चाहते त्याच्या बाजून होते.

2020 मध्ये हृतिकने तिच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर सायबर सेलकडून क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे हलविण्यात आला होता. तेव्हा कंगनाने ट्विट केलं होतं की, ‘आता हृतिकने त्याच्या आयुष्यात पुढे जावं’. हृतिक आणि कंगनाने क्रिश 3 या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आशिकी 3 मध्ये या दोघांना कास्ट केल्याची माहिती समोर आली. मात्र हृतिकने कंगनाला चित्रपट स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र