Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना पुन्हा मुंबई हायकोर्टात, आता नवा गुन्हा रद्द करण्याची मागणी

| Updated on: Dec 10, 2021 | 7:31 AM

अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) शेतकरी आंदोलन आणि शीख समुदाय यांच्यावर खलिस्तान संदर्भात आक्षेपार्ह इंस्टाग्राम पोस्ट केली होती.

Kangana Ranaut : बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना पुन्हा मुंबई हायकोर्टात, आता नवा गुन्हा रद्द करण्याची मागणी
Kangana Ranaut
Follow us on

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) शेतकरी आंदोलन आणि शीख समुदाय यांच्यावर खलिस्तान संदर्भात आक्षेपार्ह इंस्टाग्राम पोस्ट केली होती. या संदर्भात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. 23 नोव्हेंबर रोजी, खार पोलिसांनी शीख समुदायाच्या सदस्यांच्या तक्रारीच्या आधारे धार्मिक भावना भडकावण्यासंबंधी कलमअंतर्गत कंगनावर गुन्हा दाखल केला होता

कलम 295 अ अंतर्गत गुन्हा

कंगना रणौतने शेतकरी आंदोलन, शीख समुदायावर खलिस्तान संदर्भातील वादग्रस्त पोस्ट इंस्टाग्रामवर केली होती. त्या पोस्टवरुन कंगना रणौतवर भारतीय दंड संहिता कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंगनानं चुकीच्या पद्धतीन गुन्हा दाखल केल्याचा दावा करत अधिकारांचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करावं यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अ‌ॅड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली असून त्यांनी कलम 295 अ अंतर्गत हे प्रकरण येऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.

संविधानाच्या कलम 19 (1) (अ) अनुसार आपल्या मूलभूत हक्कांच्या अंतर्गत कृषी कायदे रद्द करण्यात आले त्यावर मत व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात तिच्या विरोधात गुन्हे दाखल करत तिच्यावर टीका देखील करण्यात आली होती.

पुढील आठवड्यात सुनावणी

कंगना रणौतनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कंगना विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष

कंगना रणौत 3 डिसेंबरला कारमधून पंजाबमधील चंदीगड-उणा महामार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी येथील शेतकऱ्यांनी तिची कार थांबवत तिला घेरले. तसेच जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कंगनाला संरक्षण दिले होते. तसेच तिची कार शेतकऱ्यांच्या गराड्यातून मुक्त केली होती. हा सर्व प्रकार घडत असताना कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले होते.

इतर बातम्या:

Kangana Ranaut | पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला घेरलं, कार अडवत माफी मागण्याची केली मागणी

Kangana Ranaut | पंजाबच्या किरतपूरमध्ये शेतकऱ्यांनी घातला कंगना रनौतच्या गाडीला घेराव

Kangana ranaut file petition in Bombay High Court for cancel FIR of Mumbai Police against Instagram post on Farmers Protest