जेन झी महिलांचे अनेकांसोबत शारीरिक संबंध… म्हणणाऱ्या कंगना यांचे अनेक पुरुषांसोबत अफेअर, लिस्ट फार मोठी

जेन झी महिला अनेकांशी शारीरिक संबंध ठेवतात आणि आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात... असं वादग्रस्त वक्तव्य भाजप पक्षाच्या महिला खासदार कंगना राणौत यांनी केलं आहे, ज्यामुळे वाद टोकाला पोहोचला आहे... अशात कंगना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना देखील उधाण आलं. कंगना यांनी देखील अनेक पुरुषांना डेट केलं असून, त्यांच्या बॉयफ्रेंडची लिस्ट समोर आलीये...

जेन झी महिलांचे अनेकांसोबत शारीरिक संबंध... म्हणणाऱ्या कंगना यांचे अनेक पुरुषांसोबत अफेअर, लिस्ट फार मोठी
| Updated on: Jul 31, 2026 | 11:35 AM

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी सीजेपीच्या आंदोनानंतर जेन झींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. महिलांबद्दल देखील बोलताना देखील कंगना यांची जीभ घसरली. सोशल मीडियावर एक पोस्ट करत कंगना म्हणालेल्या, ‘महिलांकडे समाजाला देण्यासाठी काहीही नाही. असं असताना ड्रग्ज घेणं, दारु पिणं आणि अनेकांशी शारीरिक संबंध ठेवत, त्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात.’, त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगना राणौत यांच्या अफेअरची मोठी लिस्ट देखील समोर आली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं करियर करत असताना कंगना यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं…

आदित्य पंचोली (Aditya Pancholi)

कंगना राणौत यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा त्यांचं नाव आदित्य पंचोली याच्यासोबत जोडण्यात आलं. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर आदित्य पहिला असा पुरुष होता, ज्याच्यासोबत कंगना याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघे अनेक वर्ष लग्न न करता पती – पत्नी सारखे राहत होते… असा देखील दावा करण्यात आलेला.

हृतिक रोशन (Hrithik Roshan)

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्या नात्याबद्दल तर आज सर्वांना माहिती आहे. कंगना यांनी यावर मोठा खुलासा देखील केला आहे. ब्रेकअपनंतर दोघांमधील वाद इतक्या टोकाला गेले की, कोर्टात हे प्रकरण पोहोचलं…

आमिर खान (Aamir Khan)

नुकताच आमिर खान याने तिसरं लग्न केलं. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा कंगना हिच्या नावाची चर्चा आमिर खान याच्यासोबत देखील रंगली. हृतिक यांच्यासोबत ब्रेकअप होत असताना अभिनेत्रीला आमिर याची साथ मिळाली… असं देखील सांगितलं जात आहे.

अध्य्यन सुमन (Adhyayan Suman)

‘राज’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान कंगना आणि अध्य्यन सुमन यांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये देखील आहे… दोघांच्या नात्याची सुरुवात उत्तम झाली, पण त्यांच्या नात्याचा अंत फार भयानक होता. अध्य्यन याने कंगना यांच्यावर फार गंभीर आरोप केले..

अजय देवगण (Ajay Devgn)

दोन मुलांचा बाप असताना देखील अजय याने कंगना यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. ‘ वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई’, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, दोघे एकमेकांच्या जवळ आले. पण जेव्हा काजोल हिला दोघांच्या नात्याचं सत्य कळलं, तेव्हा अजय याने कंगना यांच्यासोबत ब्रेकअप करत कंटुंबाला प्राधान्य दिलं.

सूरज पंचोली (Sooraj Pancholi)

आदित्य पंचोली याचा मुलगा सुरज पंचोल याच्यासोबत देखील कंगना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. सूरज आणि कंगना यांचा ब्रेकअप तेव्हा झालं जेव्हा कळलं की, आदित्य यांनी अभिनेत्रीला मारहाण केलेली… सांगायचं झालं बाप आदित्य पंचोली आणि मुलगा सूरज पंचोली यांच्यासोबत दोघांसोबत कंगना यांच्या नावाची चर्चा रंगलेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us