कंगना रनौतचा आता अरविंद केजरीवालांवर निशाणा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल !

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

कंगना रनौतचा आता अरविंद केजरीवालांवर निशाणा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. कोरोना काळातही घरी राहून ती चर्चेत होती. कंगना नेहमीच काहीतरी वादग्रस्त ट्विट करत असते. कंगनाने काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले होते. त्यानंतर कंगनाने आता आपला मोर्चा दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्याकडे वळवला आहे. मात्र, त्यानंतर कंगनाच ट्रोल झाली आहे. (Kangana Ranaut trolls on social media)

कंगनाने दिल्लीतील रिंकू शर्मा हत्ये प्रकरणात कंगनाने सीएम केजरीवाल यांच्यावर ट्विट केले होते. कंगनाने केजरीवाल यांचे 2015 चे एक ट्विट शेअर केले आणि लिहिले होते की, ‘प्रिय केजरीवाल जी, मला आशा आहे की, तुम्हीही रिंकू शर्माच्या कुटूंबाला भेटून त्यांना पाठिंबा द्याल. आपण एक राजकारणी आहात कंगनाला तिच्या याच ट्विटवरून आता ट्रोल केलं जात आहे.

काही जणांच म्हणणे आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री जरी केजरीवाल असतील तरी तेथील दिल्ली पोलिस हे राज्य नाही तर ते केंद्राच्या अधिकाराखाली येत मग आता यासर्व प्रकरणावर तू केंद्र शासनाला काही बोलणार आहेस का असे प्रश्न विचारत कंगनाला ट्रोल केलं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI