AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma: कपिल शर्माच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये महिनाभरात दोनदा गोळीबार झाला आहे. बिश्नोई गँगकडून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी खबरदारीचे पाऊल म्हणून कपिल शर्माला सुरक्षा पुरवली आहे.

Kapil Sharma: कपिल शर्माच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ
kapil Sharma Security
| Updated on: Aug 11, 2025 | 5:04 PM
Share

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वी कॅनडातील सरे शहरात एक कॅफे सुरु केला आहे. कपिल शर्माच्या या कॅप्स कॅफेमध्ये महिनाभरात दोनदा गोळीबार झाला आहे. बिश्नोई गँगकडून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी खबरदारीचे पाऊल म्हणून कपिल शर्माला सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे आता कपिलच्या जीवाला धोका तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

कपिलच्या कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानंतर मुंबईत पोलिसांनी कपिलच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती, यात त्यांना संभाव्य धोक्यांचा अंदाज आला होता. त्यामुळे आता त्याला सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या आधी कपिलला खंडणीबाबत काही विचारणा करण्यात आली आहे का? याबाबत चौकशी करण्यात आली होती, मात्र अशी कोणतीही धमकी मिळाली नसल्याची माहिती कपिलने दिली होती.

कपिलच्या कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार झाला होता, या दोन्ही गोळीबारांची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई अलायन्स म्हणजेच गोल्डी ढिल्लॉन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहिल दुहान पेटवाड यांनी घेतली होती. मात्र कपिल लॉरेन्स टोळीच्या निशाण्यावर का आहे? अला प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

सलमानशी जवळीक भोवते का ?

काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खान आणि लॉरेन्स टोळीत वाद आहे. लॉरेन्स टोळीने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानचं फार्म हाऊस आणि त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची केवळ रेकीच केली नाही तर गॅलेक्सी अपार्टमेंटवरही गोळीबार करण्यात आला, त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. गेल्या काही वर्षांत अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा सलमान खानच्या खूप जवळचा झाला आहे. तो सलमानच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानला जातो. लॉरेन्स गँग आणि त्याच्या सदस्यांना हीच गोष्ट त्रास देत आहे आणि कपिल शर्माला लक्ष्य करून, लॉरेन्स गँग सलमानच्या इतर जवळच्या सहकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो.

शीख धर्मावर केलेल्या टिप्पण्यांमुळे नाराज ?

लॉरेन्स टोळी आणि त्याचे साथीदार पंजाबचे आहेत. अलिकडेच कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ शोमध्ये एका स्पर्धकाने धर्मावर विनोदी टिप्पणी केली. त्यानंतर कपिल शर्माला धमक्या येऊ लागल्या. यानंतर, लॉरेन्स आणि त्याच्या सहयोगी टोळ्यांनी कपिल शर्माला या टिप्पणीसाठी धमकीच दिली नाही तर कॅनडामधील त्याच्या कॅप्स कॅफेवर गोळीबारही केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.