
Rajiv Kapoor-Aarti Sabharwal tragic life: बॉलिवूड फिल्म विश्वातील पहिले शोमॅन राज कपूर यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओखळ निर्माण करणारे राज कपूर यांनी तीन मुलं होती. रणधीर कपूर, ऋषी कपूर कायम प्रकाशझोतात राहिले, पण राजीव कपूर यांना फार कमी ओळखतात. ज्याचं कारण आहे बॉलिवूडमधील त्यांचं फेल झालेलं करीयर. राजीव कपूर यांच्या प्रोफेशनल आयुष्यामध्येच नाही तर, खासगी आयुष्यात देखील अनेक चढ – उतार आले.
2001 मध्ये राजीव कपूर यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 2 वर्षात राजीव कपूर यांचं लग्न घटस्फोटोपर्यंत पोहोचलं. त्यानंतर राजीव कपूर यांनी पुन्हा लग्न करण्याचा विचार केलाच नाही. राज कपूर यांनी मुलगा राजीव कपूरला ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. राजीव कपूरचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि लोकांना त्याला अभिनेता म्हणून स्वीकारण्यास जास्त वेळ लागला नाही. असं असताना देखील राज कपूर यांचं बॉलिवूड करीयर हीट ठरलं नाही.
पहिल्या सिनेमातून यश मिळाल्यानंतर राज कपूर यांचे पुढील सिनेमे चाहत्यांचं मनोरंजन करु शकलं नाहीत. अशात राज कपूर यांनी देखील मुलासाठी सिनेमे तयार करणं बंद केलं. यामुळे राज कपूर प्रचंड नाराज झाला. यावरून अनेकदा त्यांची वडिलांसोबत भांडणं देखील झाली आहेत.
सिनेमात करीयर करत असताना राजीव यांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली. अभिनेत्री दिव्या यांच्या प्रेमात राजीव कपूर होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिलं प्रेम अपूर्ण राहिल्यानंतर राजीव कपूर यांनी आरती सभरवाल यांच्यासोबत लग्न केलं. 2001 मध्ये आरती आणि राजीव यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं दोन वर्ष देखील टिकलं नाही.
राजीव कपूर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आरती यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. शिवाय स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला. एक-दोन व्यवसाय फारसे चांगले झाले नाहीत पण नंतर आरती यांनी लोणचे बनवणारी कंपनी उघडली आणि त्यानंतर त्यांचे नशीब बदलले. आरती सभरवाल आज एक यशस्वी उद्योजिका आहे.
राजीव कपूर यांना 9 फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. राज कपूर यांचा तिसरा मुलगा अनेक वर्षे दुर्दैवी जीवन जगल्यानंतर हे जग सोडून गेला. लोक राजीव कपूर यांचं नावही घेत नाहीत कारण त्यांनी बॉलिवूडला हीट सिनेमे दिले नाहीत आणि त्यांना मुलेही नाहीत.