AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करण जोहरसह हार्दिक पांड्या, केएल राहुल यांना राजस्थान कोर्टाकडून दिलासा, ‘कॉफी विथ करण’ संबंधित होता वाद

या तिघांविरुद्ध लुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लुनी पोलीस ठाण्याने आपला अंतिम अहवाल सादर करताना न्यायालयाला सांगितलं की, तिन्ही सेलिब्रिटींवर दाखल केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत.

करण जोहरसह हार्दिक पांड्या, केएल राहुल यांना राजस्थान कोर्टाकडून दिलासा, 'कॉफी विथ करण' संबंधित होता वाद
करण जोहरसह हार्दिक पांड्या, केएल राहुल यांना राजस्थान कोर्टाकडून दिलासाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 11:28 AM
Share

चित्रपट निर्माता-दिग्दर्सक करण जोहर (Karan Johar), भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना जोधपूर उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या तिघांविरुद्ध लुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लुनी पोलीस ठाण्याने आपला अंतिम अहवाल सादर करताना न्यायालयाला सांगितलं की, तिन्ही सेलिब्रिटींवर दाखल केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. लुनी पोलीस ठाण्यात वकील डीआर मेघवाल यांनी क्रिकेटर हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरुद्ध एससी-एसटी कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याशिवाय ‘कॉफी विथ करण’ शोवर महिलांवर अश्लील आणि लैंगिक टिप्पणीचे आरोपही करण्यात आले होते.

हार्दिक पांड्याने उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका

हार्दिक पांड्याने राजस्थान हायकोर्टात त्याच्यावर दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. हार्दिक पांड्याच्या वकिलांनी सांगितलं की, “ज्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर हँडल बनावट आहे. ते त्याचं अधिकृत ट्विटर हँडल नव्हते.” 2018 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यातील पोलिस तपासात पांड्यावरील आरोप लक्षात घेता खटल्यात एफआर दाखल करण्यात आला होता. पांड्यावर त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द लिहिल्याचा आरोप आहे.

‘कॉफी विथ करण’मुळेही गदारोळ

इतकंच नाही तर हार्दिक पांड्या आणि केएल राहुलसह करण जोहरवर लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये महिलांवर असभ्य आणि लैंगिक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तिघांवरही भावना दुखावल्याचा आरोप होता. एससी-एसटी कायद्याच्या विविध कलमांव्यतिरिक्त, या तिघांविरुद्ध 124A, 153A, 295A, 505, 120B IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचा अहवाल सादर केल्यानंतर हायकोर्टाने पांड्याची याचिका निकाली काढली आहे. तिन्ही सेलिब्रिटींसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. कॉफी विथ करण हा शो अनेकदा वादात सापडला आहे. सध्या या शोचा सातवा सिझन डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.

Follow Us
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!