AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की…

दायरा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या कार्यक्रमावेळी चित्रपटाची स्टार कास्ट, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर उपस्थित होते. पॅपराजीच्या एका मागणीवर करिना कपूरला राग आला. तिने थेट स्टेजवरूनच त्यांना सुनावलं. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

'दायरा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की...
'दायरा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 31, 2026 | 9:48 PM
Share

Kareena Kapoor Video: करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन स्टार कास्ट असलेल्या दायरा चित्रपटाचं चित्रिकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. हा चित्रपट 18 सप्टेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला असून इंटेंस आणि सस्पेंस चित्रपट असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. या चित्रपटात करिना कपूर एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावत आहे. एका एसआयटीचा भाग असून बलात्कार आणि मर्डरमधील आरोपीच्या एनकाउंटरचा तपास करत आहे. तर पृथ्वीराज सुकुमारन पोलीस अधिकारी असून त्याच्यावर फेक एनकाउंटरचा आरोप आहे. अशी या चित्रपटाची कथा गुंफली असून मेकर्सच्या मते, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. असं असताना या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. अभिनेत्री करीना कपूर हिने संताप व्यक्त केला. पॅपराजीच्या विचित्र वागण्यावर तिने थेट राग व्यक्त करत सँडल दाखवले.

मुंबईत दायरा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी स्टारकास्ट आणि डायरेक्टर मेघना गुलजारसह चित्रपटाच्या निगडीत लोकांनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी पॅपराजींनी हजेरी लावली होती. या दरम्यान सर्व फोकस हा करीना कपूरवर होता. इतकंच काय परफेक्ट फ्रेम मिळावी म्हणून पॅपराजीचा प्रयत्न होता. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान नुसता आरडाओरडा सुरू होता. फोटो सेशनवेळी स्टारकास्टला कधी इकडे तर कधी तिकडे जाण्याची विनवणी पॅपराजी करत होते. पण यावेळी त्यांचा आरडाओरडा पाहून आणि वारंवार केलेली विनंती पाहून करीना कपूर भडकली. तिने पॅपराजीवर आपला राग काढला.

काय म्हणाली करीना कपूर?

दायरा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमावेळी करीना कपूर आणि पृथीराज सुकुमारन दोन्ही टोकाला होते. पण पॅपराजी फ्रेमच्या नादात कधी इकडे तर कधी तिकडे वळण्याची विनंती करत होते. त्यामुळे करीना कपूर संतापली आणि म्हणाली की,’हाच सेंटर आहे, कधी इकडे कधी तिकडे.. हिल्स घातले आहेत.’

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...