बच्चन कुटुंबियांनी असं काय केलं? करिश्मा कपूर म्हणाली, ‘कोणत्याही मुलीच्या वाट्याला असं दुःख…’

Karisma Kapoor: बच्चन कुटुंबिय आणि करिश्मा कपूर यांच्यातील नातं... बच्चन कुटुंबियांनी कपूर कुटुंबाच्या लेकीसोबत असं काय केलं, ज्यामुळे अभिनेत्री भावूक होत म्हणाली, 'कोणत्याही मुलीच्या वाट्याला असं दुःख...', सध्या सर्वत्र करिश्मा कपूर हिची चर्चा...

बच्चन कुटुंबियांनी असं काय केलं? करिश्मा कपूर म्हणाली, कोणत्याही मुलीच्या वाट्याला असं दुःख...
| Updated on: Oct 29, 2024 | 3:59 PM

अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. करिश्मा हिने घटस्फोटानंतर कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्रीने सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ केला. पण उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. शिवाय महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत करिश्मा हिचा साखरपुडा देखील झाला होता. पण साखरपुड्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये काही वाद झाले आणि करिश्मा – अभिषेक यांचं नातं कायमचं संपलं. याचा वाईट परिणाम करिश्मा हिला भोगावा लागला.

अभिषेक बच्चन याच्यासोबत साखरपुडा तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिच्या मनावर वाईट परिणाम झाला होता. बच्चन कुटुंबियांसाठी देखील ती वेळ प्रचंड वाईट होती. एका मुलाखतीत करिश्मा कपूर हिने मोडलेल्या साखरपुड्यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती.

करिश्मा म्हणाली होती, ‘आता बोलण्याची वेळ आली आहे, या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी फार वेदनादायी होती. कोणत्याही मुलीच्या वाट्याला असं दुःख कधीच येऊ नये… कारण मी ते दुःख भोगलं आहे. मला माझ्या मनातील वेदना विसण्यासाठी अत्यंत धीट व्हाव लागलं…’

‘अनेक संकटांचा सामना केला आहे. जे झालं त्याचा मी आता स्वीकार केला आहे… जे नशिबात लिहिलेलं आहे ते होणारचं आहे… मी आलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी तयार नव्हती… यासाठी मी मीडियाचे आभार मानेल… सर्वांनी मला एकटीला सोडलं होतं. मला यावर आणखी काहीही बोलायचं नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

आयुष्यात आलेल्या कठीण वेळी करिश्मा सोबत कुटुंब होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘त्यावेळी माझ्यासोबत जर आई – बाबा, बहीण आणि आजी नसती तर, मी कधीच त्या दुःखातून बाहेर येऊ शकली नसती.’ सांगायचं झालं तर, करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा 2002 मध्ये मोडला…

अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. करिश्मा हिने पती आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.