अभिषेक बच्चनच नाही तर, ‘या’ पुरुषांसोबत देखील करिश्माच्या नावाची चर्चा, आज मात्र एकटीच

कपूर कुटुंबाची लेक करिश्मा हिचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं; पण लग्नानंतर देखील एकटीच 'सिंगल मदर' म्हणून दोन मुलांचा सांभाळ... 'या' अभिनेत्यासोबत मान्य नव्हत अभिनेत्रीच्या आईला नातं...

अभिषेक बच्चनच नाही तर, या पुरुषांसोबत देखील करिश्माच्या नावाची चर्चा, आज मात्र एकटीच
| Updated on: Mar 12, 2023 | 2:50 PM

karisma Kapoor love life : अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं लग्न श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं देखील आहेत. पण संजय आणि करिश्मा यांचं नातं फार काळ टिकलं नाही. करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले. तेव्हा सर्वत्र खळबळ माजली. वैवाहिक आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिल्यानंतर करिश्मा आता दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करते. पण संजय याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांसोबत करिश्माचं नाव जोडण्यात आलं.

करिश्मा कपूर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांचे मार्ग वेगळे झाले. आज देखील करिश्मा आणि अभिषेक यांच्या नात्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण करिश्माचं नाव फक्त अभिषेक याच्यासोबतच नाही तर, अन्य अभिनेत्यांसोबत देखील जोडण्यात आलं.

अभिनेता अजय देवगण : करिश्मा कपूर हिने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. अशात सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करताना दोघांमधील प्रेम बहरलं. दोघांचं प्रेम प्रकरण तुफान चर्चेत आलं. पण करिश्मा आणि अजय यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

अभिनेता अक्षय खन्ना : एक काळ असा होता, जेव्हा करिश्मा आणि अक्षय एकमेकांवर जीवापड प्रेम करत होते. एवढंच नाही तर करिश्माला अक्षय याच्यासोबत लग्न देखील करायचं होतं. करिश्मा आणि अक्षय यांचं लग्न व्हावं अशी इच्छा अभिनेत्री वडील रणधीर कपूर आणि खन्ना कुटुंबाची देखील होती. पण करिश्माची आई बबिता कपूर यांना लेकीचं अक्षय याच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.

आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिल्यानंतर करिश्मा तिच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आज करिश्मा अभिनयात सक्रिय नसली तरी अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. करिश्मा सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us