AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या हट्टामुळे Karisma Kapoor हिचं श्रीमंत उद्योजकासोबत लग्न; हनिमूनच्या रात्री पतीने ओलांडल्या मर्यादा !

'पतीने हनीमूनच्या रात्री मित्रांसोबत माझी बोली लावली आणि....', एका मुलाखतीत खुद्द करिश्मा कपूरने वैवाहिक आयु्ष्याबद्दल केला धक्कादायक खुलासा

आईच्या हट्टामुळे  Karisma Kapoor हिचं श्रीमंत उद्योजकासोबत लग्न; हनिमूनच्या रात्री पतीने ओलांडल्या मर्यादा !
| Updated on: Mar 10, 2023 | 1:11 PM
Share

Karisma Kapoor Love Life : एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र कपूर कुटुंबाची लेक आणि अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिच्या चर्चा रंगलेल्या असायच्या. ९० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्माने अनेक अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. अनेकांसोबत अभिनेत्रीचं नाव देखील जोडण्यात आलं. पण नातं लग्ना पर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिने करिश्माने श्रीमंत उद्योजका संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अभिनेत्री अनेक भयानक अनुभव आले. आलेल्या अनुभवांबद्दल खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. लग्नानंतर संजय याने हनीमूनच्या रात्री मित्रांसोबत करिश्माची बोली लावली. करिश्मा आणि संजय यांचं लग्न अभिनेत्रीची आई बबिता यांच्या हट्टामुळे झालं असं देखील अनेकदा सांगण्यात आलं.

करिश्मा, संजय याची दुसरी पत्नी आहे. संजय याचं पहिलं लग्न नंदिता मेहतानी हिच्यासोबत झालं. घटस्फोटानंतर १० दिवसांत संजयने अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत लग्न केलं. करिश्मासोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होवू लागले. याच दरम्यान करिश्माने दोन मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्मानंतर देखील संजय आणि करिश्मा यांच्यातील वाद दिवसागणिक वाढत होते.

करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले.

मिळालेल्या माहितीनुसार, हनिमूनच्या रात्रीच संजय कपूरने करिश्माची बोली लावली होती. संजय कपूरने त्याच्या मित्रांसोबत करिश्मा कपूरसाठी बोली लावली होती. हा धक्कादायक खुसाला खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

करिश्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर याने प्रिया चटवाल हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. तर घटस्फोटानंतर करिश्माने कधीही दुसरं लग्न करण्याचा विचार केला नाही. करिश्माने आयुष्यभर दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.

आता करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आज करिश्मा अभिनयात सक्रिय नसली तरी अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. करिश्मा सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या करिश्माने ‘राजा हिंदूस्तानी’, ‘दिल तो पागल हैं’, ‘राजा बाबू’, ‘हम साथ साथ हैं’, ‘हिरो नं १’ सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवाय करिश्मावर चित्रित झालेली गाणी आजही चाहत्यांचा पसंतीस उरतात. ९० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्माची ओळख होती.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.