AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे सर्व खूप भयानक, इंटरसेप्शनचे आवाज..; ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीने सांगितली दुबईतील परिस्थिती

अभिनेत्री एरिका फर्नांडिस भारत सोडून दुबईत स्थायिक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती तिथेच राहतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एरिका दुबईतील परिस्थितीबाबत मोकळेपणे व्यक्त झाली.

हे सर्व खूप भयानक, इंटरसेप्शनचे आवाज..; 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितली दुबईतील परिस्थिती
एरिका फर्नांडिसImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 3:02 PM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. अमेरिका-इस्रायल आणि इराण हल्ल्यांमुळे दुबईला जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दुबईत अनेक भारतीय अडकले आहेत. ‘जन्नत’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोनल चौहाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. तर 2023 पासून दुबईत राहायला गेलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने तिथली परिस्थिती सांगितली आहे. ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एरिकाने सांगितलं की दुबईत सुरक्षित आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिथल्या घडामोडी आणि आताची परिस्थिती कशी आहे, याविषयी सांगितलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना एरिका म्हणाली, “मी सध्या दुबईत आहे आणि इथे मी सुरक्षित आहे. युएई सरकारने खूप चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे. ते किती लवकरात लवकर परिस्थितीला प्रतिसाद देत आहेत, हे मला इथे राहून दिसतंय. हे सर्व सोपं नाहीये. इंटरसेप्शनचे आवाज खेर आहेत. हे खूप भयानक आहे. माझ्या आजूबाजूचे लोक, मित्र आणि कुटुंबीय हे सर्व स्वत:च्या डोळ्यांनी पाहत आहेत. पण हे सर्व अत्यंत भयानक आहे, यात काही शंका नाही. भीती आणि अनिश्चितता असूनही मी शांत राहण्याचा प्रयत्न करतेय. आम्ही शांत आहोत आणि सुरक्षित आहोत. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करत आहोत. सध्या आम्ही एवढंच करू शकतो.”

या परिस्थितीचा सामना करणाऱ्या प्रत्येकासाठी मला खूप वाईट वाटतंय. मग तुम्ही कुठेही असा. एकावेळी एका परिस्थितीचा आपण सामना करुयात, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता आणि सोनल चौहानसुद्धा दुबईतच आहेत. दरम्यान पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इस्रायल आणि इराणने परस्परांवर जोरदार हल्ले केले आहेत. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने प्रत्युत्तराची धमकी दिली. इराणने कतार, कुवेत आणि बहारीनवर हल्ले केले. दुबई आणि कतारची राजधानी दोहा इथं मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू आले.

Follow Us
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित
फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब...
Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात...
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...