
मुंबई | 6 डिसेंबर 2024 : ‘कसौटी जिंदगी की’ फेम कोमोलिका म्हणजेच अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्वशी ढोलकियाच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तिच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीच्या प्रकृतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी देखील व्यत्क चिंता केली. उर्वशी हिची प्रकृती लवकरात – लवकर सुधारावी म्हणून चाहते देखील प्रार्थना करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्वशी हिच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीचा रुग्णालयातील एक फोटो देखील समोर आला आहे. ज्यामुळे चाहते देखील उर्वशीचा हैराण झाले आहेत.
रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकियाच्या मानेमध्ये एक छोटी गाठ (ट्यूमर) आढळून आली, जी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढण्यात आली आहे. स्वत: उर्वशी हिने तिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. प्रकृती सुधारत असून डॉक्टरांनी आणखी 15 ते 20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे…. असं खुद्द अभिनेत्रीने सांगितलं आहे.
उर्वशी हिच्याकडून एक हेल्थ स्टेटमेंट देखील जारी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल सांगण्यात आलं आहे. ‘मानेमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाल्यानंतर डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता मला 15 ते 20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.’ अशी माहिती अभिनेत्रीने दिली आहे.
एवढंच नाही तर, उर्वशी हिचा मुलगा क्षितिज याने आईचा रुग्णालतील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. कुटुंब उर्वशी हिची काळजी घेत आहे. सांगायचं झालं तर, उर्वशी हिला जुळी मुलं आहेत. उर्वशी वयाच्या 18 व्या वर्षापासून सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे. क्षितिज आणि सागर अशी अभिनेत्रीच्या जुळ्या मुलांची नावे आहेत.
‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत खलनायकाची भूमिका बजावत उर्वशी ढोलकिया हिने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आजही तिच्या कोमलिका या भूमिकेला चाहते विसरले नाहीत. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेनंतर अभिनेत्री ‘बिग बॉस सीझन 6’ मध्ये दिसली. शोमध्ये दमदार भूमिका बजावत उर्वशी हिने ‘बिग बॉस 6’ शोची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.
उर्वशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कामय तिच्या दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा देखील प्रयत्न करत असते.