Katrina-Vicky: कतरिना-विकी मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध मंदिरात पोहोचले देवदर्शनासाठी

'या' मंदिरात दर्शन घेऊन कतरिना-विकीने केली नव्या वर्षाची सुरुवात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Katrina-Vicky: कतरिना-विकी मुंबईतील या प्रसिद्ध मंदिरात पोहोचले देवदर्शनासाठी
कतरिना-विकी मुंबईतील 'या' प्रसिद्ध मंदिरात पोहोचले देवदर्शनासाठी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2023 | 1:28 PM

मुंबई: सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली. एकीकडे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. तर दुसरीकडे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे वृंदावनला गेले होते. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीसुद्धा देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात केली. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विकी-कतरिनाने आईसह गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.

कतरिना, विकी आणि विकीची आई हे शुक्रवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. लग्नानंतर कतरिना ही पंजाबी सूनेचे सर्व कर्तव्य पार पाडताना दिसतेय, अशा शब्दांत चाहत्यांनी कौतुक केलं.

राजस्थानमधील पाली इथं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जाण्यापूर्वी कतरिना आणि विकीने त्यांच्या मुंबईतल्या घरी ख्रिसमसनिमित्त छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. राजस्थानमधील व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडीओ दोघं सोशल मीडियावर शेअर करत होते. तिथून आल्यानंतर दोघांनी देवदर्शन केलं.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकीचा ‘गोविंदा मेरा नाम’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये त्याने कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत भूमिका साकारली होती. तर गेल्या वर्षी कतरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये तिने सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्यासोबत काम केलं होतं.

विकी-कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘बिग-फॅट वेडिंग’ न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित साधेपणानं लग्न करणं पसंत केलं.

“लग्नसोहळा खासगीत पार पाडण्यापेक्षा आम्ही कोरोनाच्या नियमांमुळे अधिक सावध होतो. माझ्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती आणि अशा गोष्टीला तुम्हाला गांभीर्यानेच घ्यावं लागतं. गेल्या वर्षीपेक्षा हे वर्ष खूपच बरं आहे. पण आम्हाला लग्नसोहळ्यात प्रत्येक गोष्टीबद्दल बारकाईने काळजी घ्यावी लागली. राजस्थानमध्ये लग्न खूप छान पद्धतीने पार पडला आणि आम्ही दोघं खूप खूश आहोत”, असं कतरिना एका मुलाखतीत म्हणाली होती.