कतरिना, विकी, शाहिदकडून निर्भया पथकाचा व्हिडीओ शेअर, त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला; तुम्ही व्हिडीओ पाहिला का ?

कतरिना कैफशिवाय शाहिद कपूर, विकी कौशल आणि सारा अली खान यांनीही मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कतरिना, विकी, शाहिदकडून निर्भया पथकाचा व्हिडीओ शेअर, त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला; तुम्ही व्हिडीओ पाहिला का ?
मुंबई पोलिसांचं निर्भया पथक
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 5:14 PM

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आता मुंबई पोलीस अधिक सतर्क झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनी ‘निर्भया पथक’ (Nirbhaya Squad)सुध्दा सुरू केले आहे. शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या (mumbai) रस्त्यावर वेगवेगळ्या वयोगटातील महिला त्यांच्या कामातून बाहेर पडताना दिसत आहेत, तिथे काही विकृत प्रवृत्ती त्यांच्या मागे चालताना दिसत आहेत. महिला त्यांच्या फोनवरून 103 डायल करतात आणि त्याच ठिकाणी पीसीआर महिलांच्या मागे उभा राहतो, त्यानंतर मुंबई पोलीस (mumbai police) विकृत प्रवृत्तीला धडा शिकवतात, असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

महिलांच्या मदतीसाठी शेअर केला व्हिडीओ

कटरिना कैपने आपल्या इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत असताना त्यांनी लिहिलं आहे की, निर्भया पथक महिलांसाठी मुंबईत कार्यरत आहे. हे महिलांच्यासाठी बनवण्यात आलं आहे. 103 नंबर हा फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आला आहे. ज्यावेळी एखाद्या महिलेला अडचण निर्माण होईल तेव्हा त्यावेळी निर्भया पथक तुमच्यासोबत असेल. त्यावेळी तुम्ही विकृत प्रवृत्तीला धडा शिकवू शकता.

या कलाकारांकडून निर्भया पथकाचं स्वागत

कतरिना कैफशिवाय शाहिद कपूर, विकी कौशल आणि सारा अली खान यांनीही मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शाहिद म्हणाला, की ‘मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी म्हणून आवश्यक पाऊल उचलले आहे. हा चांगला मेसेज असून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय, साराने तिच्या स्टोरीमधून हा व्हिडिओ शेअर केल्याचं दिसतंय. तर त्याचवेळी विकी कौशलने मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचा व्हिडीओही शेअर करत महिलांनी त्यांच्या फोनच्या स्पीड डायलमध्ये नेहमी १०३ नंबर सेव्ह करावा, असे आवाहन केले आहे.

Celebs Corona Positive :साऊथ सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी

Republic Day 2022: ‘ए मेरे वतन के लोगों’ पासून ‘ये देश है वीर जवानों का’ ही सहाबहार गाणी तुम्ही ऐकली आहेत का ?

प्रजासत्ताक दिनी बॉलिवूडचे 5 चित्रपट अधिक पाहिले जातात, तुम्ही पाहिलेत का ?