
बॉलिवू़डचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन हे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’शोचे सूत्रसंचालन करत आहेत. दरवर्षी चाहते या क्विझ रिॲलिटी शोची वाट पाहत असतात. आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्यासाठी लोक या शोमध्ये येतात. कौन बनेगा करोडपतीचे आत्तापर्यंत 15 सीझन पूर्ण झाले असून आता 16वा सीझन सुरू होत आहे. शोच्या नवीन सीझनसाठी नोंदणीही सुरू झाली आहे. नवीन सीझन लवकरच सुरू होणार आहे. दरवेळेप्रमाणे बिग बीच या शोच्या नव्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. गेल्या १५ सीझनमध्ये या शोमध्ये किती बदल झाला आहे ते जाणून घेऊया.
‘कौन बनेगा करोडपती’ चा पहिला सीझन हा 2000 साली सुरू होता. पहिल्या सीझनमध्ये बक्षिसाची रक्कम 1 कोटी रुपये होती. तर नंतरच्या सीझनमध्य ही रक्कम वाढवून 5 कोटी रुपये इतकी करण्यात आली. मात्र चौथ्या सीझनमध्ये ही रक्कम पुन्हा 1 कोटी रुपये ठेवण्यात आली. मात्र तेव्हा जॅकपॉट प्रश्न ठेवण्यात आला होता, ज्याद्वारे शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक हे 5 कोटी रुपये जिंकू शकत होते.
पहिल्या सीझनमध्ये बिग बींचे मानधन किती ?
अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनपासनच होस्ट म्हणून सुरुवात केली होती. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना पहिल्या सीझनसाठी प्रत्येक एपिसोडसठी 25 लाख रुपये मिळाले होते. या सीझनमध्ये अनेक मोठे स्टार्स सहभागी झाले आले. ज्यामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी, सचिन तेंडुलकर यांचा समावेश होता. दुसरा आणि चौथा सीझनही बिग बींनी होस्ट केला होता. मात्र त्याची फी नमूद करण्यात आलेली नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिग बींनी तिसरा सीझन होस्ट केला नाही. तिसरा सीझन हा अभिनेता शाहरुख खानने होस्ट केला होता.
सीझन 5
त्यानतर अमिताभ बच्चन यांनी शानदार पुनरागमन केले. रिपोर्टनुसार, त्यांनी पाचव्या सीझनच्या प्रत्येक भागासाठी 1 कोटी रुपये चार्ज केले होते. हा सीझन 2011 साली आला होता, त्यावेळीही अनक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
सीझन 6 आणि 7
प्रत्येक सीझननंतर अमिताभ बच्चन यांनीही आपली फी वाढवायला सुरुवात केली. त्यांमी सीझन 6 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 1.5 कोटी रुपये आणि सीझन 7मध्ये प्रत्येक भागासाठी 2 कोटी रुपये फी आकारली.
सीझन 8
कौन बनेगा करोडपतीचा 8वा सीझन प्रचंड गाजला. या सीझनसाठी बिग बी प्रत्येक एपिसोडसाठी २ कोटी रुपये घेत होते. या सीझनमध्ये शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण खास पाहुणे म्हणून शोमध्ये आले होते.
सीझन 9
अमिताभ बच्चन यांनी सीझन 9 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 2.6 कोटी रुपये आकारले. या सीझनमध्येही बिग बींनी गेल्या सीझनपेक्षा फी वाढवली होती. कौन बनेगा करोडपतीसाठी बिग बींना नेहमीच मागणी असते. ‘कौन बनेगा करोडपती’चा विषय निघतो तेव्हा अमिताभ बच्चन यांचं नावच लोकांच्या ओठी येतं.
सीझन 10
कौन बनेगा करोडपतीचा सीझन 10 हा 2018 मध्ये आला होता. या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी बिग बी 3 कोटी रुपये घेत होते. प्रत्येक सीझनमध्ये अनेक भाग असतात. त्यामुळे बिग बी दर सीझनमधून बक्कळ कमाई करतात.
सीझन 11,12 आणि 13
11, 12 आणि 13 व्या सीझनमध्ये बिग बींची फी सारखीच होती. एका एपिसोडसाठी ते साडेतीन कोटी रुपये घेत होचे. हा सीझनही बॉलिवूड सेलिब्रिटींनी भरलेला होता. या सीझनमध्ये अनेक मोठे स्टार्स आले.
सीझन 14 आणि 15
बिग बींनी 14व्या सीझनसाठी मोठी फी आकारली होती. ते प्रत्येक एपिसोडसाठी 4-5 कोटी रुपये घेत असत. तर 15 वा सीझनदेखील बराच हिट झाला. तेव्हाही त्यांनी प्रत्येक भागासाठी 4-5 कोटी रुपये आकारले. केबीसीच्या प्रत्येक सीझनसोबत त्यात काही ना काही बदल झाले आहेत जे लोकांच्या खूप पसंतीस उतरले. 15व्या सीझननंतर आता 16वा सीझन येत आहे. ज्याची चाहत्यांना खूप उत्सुकत आहे. मात्र या सीझनसाठी बिग बी किती फी घेतील याचा खुलासा अद्याप झालेला नाही