KBC 14 : कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व आजपासून; पहिल्या दिवशी हॉट सीटवर स्पर्धकांसह असणार एक खास चेहरा!

| Updated on: Aug 07, 2022 | 9:02 PM

अमित बच्चन यांच्या चाहत्यांना आज बच्चन यांचे देवियों और सज्जनों... हे शब्द ऐकायला मिळतील. या हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. तसंच सोनी लाईव्हवरही हा शो ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

KBC 14 : कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व आजपासून; पहिल्या दिवशी हॉट सीटवर स्पर्धकांसह असणार एक खास चेहरा!
Amitabh Bachchan KBC
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वांचा आवडता आणि चर्चेतील रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीचं (Kaun Banega Karodpati) नवं पर्व आजपासून सुरु होत आहे. यावेळीही बॉलिवूड मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा शो होस्ट करणार आहेत. छोट्या पडद्याच्या इतिहासा सर्वाधिक काळ चालणारा क्विज शो (Quiz Show) म्हणून कौन बनेगा करोडपतीकडे पाहिलं जातं. या शोचं नवं पर्व कधीपासून सुरु होणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली होती. अमित बच्चन यांच्या चाहत्यांना आज बच्चन यांचे देवियों और सज्जनों… हे शब्द ऐकायला मिळतील. या हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. तसंच सोनी लाईव्हवरही हा शो ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

सोनी टीव्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करणार

अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त होस्टिंगद्वारे चाहत्यांची मनं जिंकतील. कौन बनेगा करोडपतीच्या नव्या पर्वाच्या प्रोमोवरुन हा शो अधिक आकर्षक आणि रोमांचक असेल हे स्पष्ट दिसत आहे. केबीसीमध्ये यावेळी काही नवे नियम आणि नवे बदल असणार आहेत. शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर स्पर्धकांसह आमिर खान असणार आहेत. सोनी टीव्हीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे की, कौन बनेगा करोडपतीचं नवं पर्व रविवार दि. 7 ऑगस्ट रात्री 9 वाजता टेलीकास्ट केलं जाईल. सोबतच सोनी टीव्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करणार आहे. त्यामुळेच केबीसीचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. यात अनेक मोठे आणि सुप्रसिद्ध हस्ती सहभागी होतील. केबीसी 14 च्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख करताना दिसत आहेत.

शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता आमिर खानसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. कारगिल युद्धातील शूर सैनिक डीपी सिंह, कर्नल मिताली मधुमिता, बॉक्सर मेरी कोम, फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा यात समावेश असणार आहे.

काय आहेत नवे नियम?

  1. आता जॅकपॉट प्रश्न 7 कोटी नाही तर साडे सात कोटीचा असेल.
  2. शेवटच्या टप्प्यात चुकीचं उत्तर दिलं तरी स्पर्धकाला मोठी रक्कम मिळेल. आधी 1 कोटी किंवा 7 कोटीच्या प्रश्नाला चुकीचं उत्तर दिल्यास स्पर्धकाला केवळ 3 लाख 20 हजाराचीच रक्कम मिळत होती. पण आता कोणता स्पर्धक 1 कोटी बक्षीसाच्या प्रश्नाचं उत्तर देऊन साडे सात कोटी बक्षीसाच्या प्रश्नासाठी खेळेल आणि त्याचं उत्तर तो देऊ शकला नाही, तर त्याला 75 लाख रुपये मिळतील.
  3. केबीसी 14 मध्ये 75 लाखाचा प्रश्नही असणार आहे.