KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विराट कोहलीबद्दलचा हा प्रश्न विचारला; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?

केबीसी 17 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला विराट कोहलीबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर स्पर्धकाने दिल. त्यानंतर बिग बींनी विराटचा तो भावनिक क्षणही सांगितला. पण शोमध्ये विचारलेला विराटबद्दलच्या या पश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?

KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विराट कोहलीबद्दलचा हा प्रश्न विचारला; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?
KBC 17 Amitabh Bachchan Asks Virat Kohli Question
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2025 | 3:14 PM

सध्या अमिताभ बच्चन यांच्या KBC 17 ची चर्चा होताना दिसतेय. शोचे जे काही चंक व्हायरल होत आहेत त्यावरून शोला मिळणारी पसंती आणि आवड लक्षात येते. तसेच स्पर्धकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे व्हिडीओ देखील समोर येत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर त्या स्पर्धकानेही बरोबर दिलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी विराट कोलहीबद्दल खूप कौतुकही केलं.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे केवळ भारतातच नाही तर जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन देखील भारतातील या स्टार खेळाडूचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीबद्दल विचारलेला प्रश्न काय होता?

कौन बनेगा करोडपती सीझन 17 च्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारला. हा प्रश्न क्रिकेटशी संबंधित होता, ज्यामध्ये चार पर्याय देण्यात आले होते.

प्रश्न :  तो प्रश्न होता की, 2025 मध्ये, कारकिर्दीत एकाच फ्रँचायझीसाठी 9000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण?

प्रश्नाचे उत्तर : अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर, स्पर्धकाने विराट कोहली असे उत्तर दिले, जे अगदी बरोबर होते. विराट कोहलीने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळताना 9000 धावा पूर्ण केल्या.

अमिताभ यांनी केले कोहलीचे कौतुक

यावेळी अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीचं कौतुक करत विराटच्या एका भावनिक क्षणाची आठवणही करून दिली.ते म्हणाले की, ‘विराट कोहली त्याच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त आरसीबीकडून खेळला आहे आणि तो कधीही जिंकला नाही’. यानंतर, अमिताभ त्याच्या समोर बसलेल्या स्पर्धकाला सांगतात की, ‘तो जिंकला तेव्हा तुम्ही ते दृश्य पाहिले असेल. एखादी व्यक्ती इतकी भावनिक होते, अगदी इतकी मोठी क्रिकेटपटूही, जी जगभरात प्रसिद्ध आहे. इतक्या वर्षांनी जेव्हा विजय मिळतो तेव्हा ती व्यक्ती थोडीशी हादरते’.


विराट कोहलीचा तो भावनिक क्षण

2008 मध्ये आयपीएल सुरू झाले, तेव्हापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. विराटच्या संघाने 17 हंगामात एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नव्हते. आयपीएलच्या 18 व्या हंगामात मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पहिले आयपीएल जेतेपद जिंकले, त्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आरसीबीच्या विजयानंतर, विराट कोहलीच्या या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.