Amitabh Bachchan : अख्खं जग विसरलात तरी चालेल पण… विवाहीत पुरूषांना बिग बींनी काय दिला कानमंत्र ?

'कौन बनेगा करोडपती 18' या शोमध्ये अमिताभ बच्चन बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात. यावेळी त्यांनी लग्न झालेल्या पुरूषांना एक खास सल्ला दिला आहे. काय म्हणाले Big B ?

Amitabh Bachchan : अख्खं जग विसरलात तरी चालेल पण... विवाहीत पुरूषांना बिग बींनी काय दिला कानमंत्र ?
Amitabh Bachchan's Hilarious Advice to married men
| Updated on: Aug 27, 2026 | 7:26 PM

Kaun Banega Crorepati 18 : बॉलीवूडचे महायनाक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे फक्त कुशल अभिनेतेच नव्हे तर ते त्यांच्या मजेशीर अंदाजामुळे, ह्युमरमुळे आणि हजरजबाबीपणामुळे लोकांचं मन जिंकून घेतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये त्यांचा अनेकदा मजेशीर अंदाज, वागणं दिसतं. सध्या केबीसीचा 18 वा सीझन सुरू आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे सहभागी स्पर्धकांना कोट्यधीश होण्याची संधी तर देतातच, पण विविध किस्से सांगून मनोरंजन करत लोकांना खूप हसवतात देखील.  नुकताच त्यांनी या शोमध्ये मजेशीर सल्ला दिला.

बिग बींनी काय दिला कानमंत्र ?

बोलता बोलता एक विषय निघाल्यावर केबीसीमध्ये जे पुरूष होते, त्यांना उद्देशून अमिताभ बच्चन म्हणाले,” आज जे विवाहीत पुरूष इथे आहेत, त्यांनी लक्ष देऊन ऐका. सगळं जग विसरलात तरी चालेल पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं होतं.. ती तारीख कधीच विसरू नका. ही तारीख खूप महत्वाची असते. पत्नी तुम्हाला वारंवार विचारेल की आपलं लग्न कधी झालं होतं, जर तुम्ही त्याचं चुकीच उत्तर दिलंत तर मग बूट, चप्पल, लाटणं काहीही खावं लागू शकतं..” असं बिग बी मजेत म्हणाले. त्यांचा हाँ मजेशीर सल्ला ऐकून शोसाठी उपस्थित सगळेच जोरजोरात हसू लागले. बिग बी हे केबीसीमध्ये अनेकदा अशा मजेशीर अंदाजात काही गोष्टी सांगत असतात त्यामुळे स्पर्धकांचाही ताण थोडा हलका होतो, त्यांनाही रिलॅक्स वाटतं.

घरी पोहोचायला उशीर झाला तर…

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी निगडीत किस्सा शेअर केला होता. शूटिंगमुळे जर कधी घरी पोहोचायला उशीर होणार असेल तर मी सकाळीच घरच्यांना तसं सांगून ठेवतो. म्हणजे घरी गेल्यावर त्यावरून प्रश्नोत्तरं होत नाहीत. जया बच्चन यांचा ओरडा खाण्यापासून वाचण्यासाठी अशी शक्कल लढवत असल्याचं बिग बींनी सांगितलं होतं. तसंच घरात जस एखाद दिस स्टाफ नसेल तर आपली काम मी स्वत:ची स्वत:च करतो, असंही अमिताभ बच्चन यांनी नमूद केलं होतं.

Follow Us