Keerthy Suresh : आमचं नातं…निर्मात्यासोबतच्या व्हायरल व्हिडिओवर कीर्ती सुरेशनं सोडलं मौन, नेटकाऱ्याला सुनावलं
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. त्यातच एका प्रेस कॉन्फर्न्स दरम्यान त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने तिला तिची इच्छा नसताना हात लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झााला. आता यावर कीर्तीने अखेर मौन सोडले आहे.

अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि दिग्दर्शक मिश्किन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगल्याच प्रकारे चर्चेत आला आहे. एका चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान मिश्किन यांनी कीर्तीच्या मांडीवर हात ठेवल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कीर्ती यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून त्या अस्वस्थ झाल्याचा दावा केला. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता कीर्ती सुरेश यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर तिने दिलेल्या उत्तराचीही चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं
कीर्ती सुरेश सध्या तिच्या आगामी सत्यवान सावित्री या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री किर्ती सुरेश आणि चित्रपटाशी संबंधित दिग्दर्शक- अभिनेते मिश्किन उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मिश्किन किर्तीच्या शेजारी बसले होते. ते किर्तीबद्दल बोलत असताना त्यांनी अचानक कीर्ती यांच्या मांडीजवळ हात ठेवला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कीर्ती यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिला स्पर्श होताच ती अस्वस्थ झाली असे म्हणणे मांडले. काहींनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कलाकरांच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर केला पाहिजे असं म्हटलं, तर काहींनी या प्रसंगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज असल्याचं सांगितलं. त्यामुळे ,सोशल मीडियावर या व्हिडिओवरून चर्चा सुरू झाली.
कीर्तीने यावर अखेर मौन सोडलं
वाद वाढतंच गेल्यावर कीर्तीने यावर अखेर मौन सोडलं आहे. तिने सोशल मिडिया पोस्ट करत एका युजरच्या कमेंटवर सुनावतं स्पष्ट केलं आहे की, ‘ पहिलं म्हणजे, माझ्या चेहऱ्यावर तुला कुठे अस्वस्थता दिसली? आमचं नातं वडील आणि मुलीसारखं आहे, असं ते आणि मी म्हणाले हे तुम्ही ऐकलं नाही का? दुसरं म्हणजे, मला अस्वस्थ वाटत असूनही, चित्रपटांमध्ये आम्ही एकमेकांना स्पर्श करतो म्हणून मी सार्वजनिक ठिकाणीही तेच सहन करावं असं तुमचं म्हणणं आहे का? दादा, तुला काही गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात.”
कीर्ती सुरेशने तिच्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, तिचे आणि चित्रपट निर्माते मिश्किन यांचे जवळचे नाते आहे. त्यांनी तिला कधीही अयोग्यरित्या स्पर्श केला नाही, तसेच त्यांच्या स्पर्शाने तिला कधीही अस्वस्थ वाटले नाही.
चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, प्रवीण एस. विजय दिग्दर्शित ‘सत्यवान सावित्री’ हा एक आगामी कोर्टरूम ड्रामा असून, यात कीर्ती सुरेशने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. मिशकिन एका वरिष्ठ वकिलाची भूमिका साकारत आहेत, जे नंतर न्यायालयात तिच्यासमोर उभे राहतात. हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.