Kiara Advani : भरसमुद्रात कियाराचे जलपरीसारखी स्विमिंग; व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

कियारा सध्या तिच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्सही तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. (Kiara Advani's swimming across the ocean; The video went viral on social media)

Kiara Advani : भरसमुद्रात कियाराचे जलपरीसारखी स्विमिंग; व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर धुमाकूळ
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 7:05 PM

मुंबई : अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा ग्लॅमरस आणि सुंदर अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आकर्षित करतो. तिचे चाहते तिच्या प्रत्येक नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. आता कियारानं तिच्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, जो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे.

अंडरवॉटर स्विमिंग करताना दिसली कियारा अडवाणी

किराचा अंडरवॉटर लूक खरोखरच दमदार दिसतो आहे. व्हिडीओमध्ये असं दिसतंय की कियारा निऑन कलरच्या बिकिनीमध्ये आहे. सोबतच पाण्याखालील स्विमिंग करत खोल जाण्याच्या प्रयत्नात ती आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ (See Video)

कियाराचा व्हिडीओ सध्या चर्चेत

कियारा सध्या तिच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. चाहत्यांसोबतच सेलेब्सही तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका नेटकऱ्यानं लिहिलं, ‘ओह सायरन’. तर दुसरीकडे दुसर्‍याने लिहिले आहे की, ‘कियारा, तुमचा प्रत्येक लुक वेगळा असतो’. याशिवाय एकनं तर तिला विचारलं की सिद्धार्थ मल्होत्रा ​​कुठं आहे?

कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये !

कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यातील संबंधांबद्दल बोलायचं झालं तर, रिपोर्ट्सनुसार, दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघं मालदीवमध्ये एकत्र प्रवास आणि सुट्टीत धमाल करताना  दिसले होते. सिद्धार्थ किंवा कियारा या दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबद्दल स्वत: सांगितलं नसलं तरी एका मुलाखती दरम्यान कियारानं उघड केलं होतं की या वर्षाच्या सुरुवातीलाच ती एका व्यक्तीबरोबर रोमँटिक डेटवर गेली होती.

झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये

कियाराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 2014 मध्ये ‘फुगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, मात्र  ‘कबीर सिंग’ या चित्रपटानं तिला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं तर ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ आणि कार्तिक आर्यनसोबत  ‘भूल भुलैया’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘जुग-जुग जिओ’ चित्रपटाचा ही एक भाग आहे.

संबंधित बातम्या

Ananya Pandey : अनन्या पांडेचा स्टायलिश अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

Workout Mode On : जिम सुरु होताच कलाकारांची एन्ट्री, इमरान, सारा आणि सनी लिओनीसह ‘हे’ कलाकार झाले स्पॉट

Heropanti 2 : रशियामध्ये हीरोपंती 2’चं चित्रिकरण, मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये अ‍ॅक्शन सीन चित्रित होणार