KING : अॅक्शन, दमदार डायलॉग्स अन् शाहरुखचा स्वॅग! ‘किंग’च्या टीझरबाबत मोठी माहिती समोर, कधी होणार रिलीज ?
KING: शाहरुख खान 2023 नंतर आता यावर्षी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्याच्या पुढल्या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत, तो म्हणजे 'किंग'. या चित्रपटाचा टीजर कधी रिलीज होणार ?

KING : 2026 च्या सुरूवातील अनेक मोठे चित्रपट रिलीज झाले, ज्यापैकी काही सुपर-डुपर हिट ठरले, तर काही चित्रपटांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता वर्ष संपताना बॉलिवूडचा बादशाह, शाहरुख खानीच अखेर मोठ्या पडद्यावर वापसी होणार आहे. 2023 नंतर, म्हणजे तब्बल 3 वर्ष शाहरुखचा एकही चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झालेला नव्हता. त्यामुळे शाहरुखने त्याचा अपकमिंग चित्रपट KING वर फोकस ठेवला आहे, या चित्रपटात तगडी स्टारकास्टही दिसणार आहे. या वर्षाअखेरीस, ख्रिसमसच्या वेळेस, 24 डिसेंबर 2026 ला हा पिक्चर मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. मात्र चित्रपटाचं काम अजूनही सुरू आहेच. याचदरम्यान 2 नोव्हेंबरला शाहरुखचा वाढदिवस येतोय आणि त्याचनिमित्ताने मेकर्सनी तगडं प्लानिंग केलं आहे. अखेर कधी येणार ‘किंग’ टीजर ?
सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलेला ‘किंग’ हा यावर्षीच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. कारण तब्बल 3 वर्षआंनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाची प्रॉडक्शन कॉस्ट 450 कोटी असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटात जो काम करत आहेत, ते अनेक कलाकार या एंटरटेनिंग चित्रपटाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. या चित्रपटाच्या मोठ्या थिएटर रिलीजसाठी आता अवघे 70 दिवस शिल्लक आहेत. अशातच, 2 नोव्हेंबर रोजी ‘किंग’चा दमदार अॅक्शनने भरलेला टीझर रिलीज करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
‘किंग’च्या टीजरसाठी मेकर्सचं तगडं प्लानिंग ?
नुकताच ‘बॉलिवूड हंगामा’मध्ये यासंदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला. या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी शाहरुख खानच्या वाढदिवशी ‘किंग’मधील त्याचा पहिला लूक समोर आला होता. त्यामुळे यंदाही या पिक्चरलाच टीझर रिलीज करण्यासाठी, त्याच्या वाढदिवसापेक्षा दुसरा चांगला दिवस कोणता असू शकतो ? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘किंग’च्या टीमकडून, ही शाहरुखच्या लाखो चाहत्यांसाठी एक भेटच असेल. याद्वारे सिद्धार्थ आनंद हा SRK चा एक नवा अनुभ, लोकांसमोर मांडणार आहे. हा टीझर जबरदस्त असून, यात शाहरुख खानचा यापूर्वी कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळेल. तो आपली खास स्टाइल आणि रुबाबात दमदार संवाद म्हणताना दिसणार आहे.”
याोबतच अशीही चर्चा सुरू आहे की टीझरसोबतच, ‘किंग’साठी मार्केटिंग कँपेनची ग्लोबल सुरूवात होणार आहे. प्रेक्षकांना जर ‘पठाण’ आणि ‘जवान’ची स्केल आवडली असेल, तर ‘किंग’ द्वारे सिद्धार्थ आनंद आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. या चित्रपटातील ॲक्शन, थ्रिल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपटाचं म्युझिक, त्याचं संगीत लोकांना खूपच आवडेल,अशी सर्वांनाच आशा आहे.
करीना कपूरही दिसणार ?
नुकतीच अशी माहिती समोर आली होती या मल्टी-स्टारर चित्रपाटत आता करीना कपूर देखील दिसणार आहे. KING मध्ये करीनाचा स्पोशन अपीअरन्स असेल. ती ‘डॅडी कूल’ या गाण्यावर शाहरुख खानसोबत थिरकताना दिसेल. ऑक्टोबरमध्ये साऊथ आफ्रिकेत याचं शूटिंग करण्याचा मेकर्सचा प्लान असल्याचं बोललं जात आहे.