AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan याला नक्की झालं तरी काय? भाईजान म्हणाला, ‘हालत खराब’

सलमान खान याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट, भाईजानला नक्की झालं तरी काय? फोटो पाहिल्यानंतर चहते चिंतेत... सध्या सर्वत्र अभिनेता आणि त्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा...

Salman Khan याला नक्की झालं तरी काय? भाईजान म्हणाला, 'हालत खराब'
| Updated on: Apr 14, 2023 | 5:22 PM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सलमान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सर्वत्र ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा सुरु असताना सलमान खानचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये सलमान खान एका ठिकाणी बसलेला आहे. सलमानचा असा फोटो पाहिल्यानंतर चाहते देखील चिंता व्यक्त करत आहे. खुद्द सलमानने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, ‘हालत खराब’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या फोटोची चर्चा आहे.

सलमान खान याच्या प्रत्येक चाहत्यांला माहिती आहे की, अभिनेता अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. ‘बजरंगी भाईजान’ फेम अभिनेता कायम फिटनेसमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याने लेग्स डेचं निमित्त साधत काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत लिहिलेल्या कॅप्शनमुळे सलमान खान चर्चेत आला आहे. सलमानच्या फोटोवर अनेक चाहत्यांची कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव देखील केला आहे.

अभिनेता गेल्या काही दिवसांपासून आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील झळकणार आहे. तर सिनेमात राघव जुयाल देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. पण व्हायरल झालेला व्हिडीओ इडिट केलेले होता.

दरम्यान, चाहते कायम सलमान याला कायम एतकच प्रश्न विचारतात तो म्हणजे ‘लग्न कधी करणार?’ सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं, पण कोणत्याचं अभिनेत्रीसोबत भाईजानचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण आज देखील सलमानच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.