AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खान याच्या मुलाला डेट करतेय श्वेता तिवारीची लेक! म्हणाली, ‘प्रेम विचार करुन…’

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी लवकरच अभिनेता सलमान खान याच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशात पलक आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम याला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे.

सैफ अली खान याच्या मुलाला डेट करतेय श्वेता तिवारीची लेक! म्हणाली, 'प्रेम विचार करुन...'
| Updated on: Apr 03, 2023 | 12:14 PM
Share

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. श्वेता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली. आता श्वेता चर्चेत नसून अभिनेत्रीची लेक पलक तिवारी तुफान चर्चेत आहे. पलक लवकरच अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी का जान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याआधी पलक गायक हार्डी संधू याच्या ‘बिजली’ या गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी पलक तिवारी प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास यशस्वी होते की नाही… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पलक सध्या तिच्या प्रेफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे.

श्वेता तिवारी हिची लाडकी मुलगी पलक तिवारी आणि अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम खान याला डेट करत असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. अनेकदा दोघांना हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, जेव्हा पहिल्यांदा पलक हिला इब्राहिम याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं, तेव्हा पलकने स्वतःचा चेहरा लपवला होता.

पलक आणि इब्राहिम यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? अशा चर्चांनी जोर धरला. शिवाय त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेय. गेल्या वर्षी जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं तेव्हा पलक म्हणाली, ‘आईला सांगितलं नसल्यामुळे चेहरा लपवत होती…’ त्यानंतर आता पुन्हा पलक हिने इब्राहिम यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

पलक हिने दिलेल्या माहितीनुसार, सध्या श्वेताची लेक दोन सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय हे वर्ष तिच्यासाठी खास आहे… असं देखील पलक म्हणाली. यावेळी पलक हिला इब्राहिम याच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील विचारण्यात आलं, यावर अभिनेत्री म्हणाली, ‘प्रेम कधीच विचार करुन होत नाही… याबद्दल कोणतीही भविष्यवाणी देखील होवू शकत नाही…’ सध्या पलकचं वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे.

पलक हिच्यासोबतस असलेल्या नात्याबद्दल इब्राहिम याला देखील विचारण्यात आलं. पण त्याने अद्याप नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाही. पलकबद्दल सांगायचं झालं तर, ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री झालेली नसताना देखील पलकच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पलक कायम सोशल मीडियावर स्वतःचे हॉट आणि ग्ल्रमरस फोटो शेअर करत असते.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.