AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुण्याचा राघू’ने ओळख मिळाली, आनंद-मिलिंद शिंदेंचा प्रभाव; वाचा, गायक राहुल शिंदे यांचे किस्से

लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांच्या संपर्कात आल्यावर राहुल शिंदे यांच्यातला गायक आकाराला आला. (know about 'punyacha raghu' rahul shinde)

'पुण्याचा राघू'ने ओळख मिळाली, आनंद-मिलिंद शिंदेंचा प्रभाव; वाचा, गायक राहुल शिंदे यांचे किस्से
rahul shinde
| Updated on: May 07, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई: लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांच्या संपर्कात आल्यावर राहुल शिंदे यांच्यातला गायक आकाराला आला. त्यानंतर ‘पुण्याचा राघू’ ही कॅसेट आली आणि त्यांची स्वतंत्र ओळख बनली. परंतु आजही स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे आणि आनंद-मिलिंद शिंदे हेच त्यांचे गुरुस्थानी आहेत. राहुल यांच्यावर आनंद-मिलिंद यांचा प्रचंड प्रभाव आहे. तो इतका की राहणीमानापासून ते हेअरस्टाईलपर्यंत ते आनंद-मिलिंद यांना कॉपी करतात. मात्र, गाणं आणि आवाज हा त्यांचा अस्सल बाज आहे. (know about ‘punyacha raghu’ rahul shinde)

पहिलं गाणं

राहुल शिंदे यांनी त्यानंतर मिलिंद शिंदे यांची संगत धरली. त्यांच्यासोबत फिरायला जाणे, कार्यक्रमात जाऊन साथसंगत करणे, राज्यभर प्रवास करणे आदींवर त्यांनी भर दिला. राहुल यांनी 1992 मध्ये पहिलं गाणं स्टेजवर गायलं. त्यांच्याच वस्तीत कार्यक्रम होता. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने आत्मविश्वास बळावला आणि राहुल यांचा गायक म्हणून प्रवास सुरू झाला. एकदा त्यांनी मिलिंद शिंदे यांच्याकडे कॅसेटमध्ये गाण्याची इच्छा व्यक्त केली. मिलिंद शिंदे यांनी ‘निळी सलामी’ कॅसेटमध्ये संधी देऊन त्यांची ही इच्छाही पूर्ण केली. या कॅसेटमध्ये प्रल्हाद शिंदे यांचीही गाणी होती. प्रल्हाद शिंदे आणि आनंद-मिलिंद यांच्यासमोर गाणं गाताना राहुल यांना दडपण आलं. पण प्रल्हाद शिंदेंनी धीर दिला आणि रेकॉर्डिंग पूर्ण झालं.

गाजत असे नाव गं, असा होता भीमराव गं…

‘निळी सलामी’त गायलेलं त्यांचं हे पहिलंवहिलं गाणं होतं. गाणं गाताना राहुल प्रचंड घाबरले होते. परंतु, आता नाही गायलास तर पुन्हा कधीच गाऊ शकणार नाही, असं प्रल्हाददादांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना धीर आला होता. त्यानंतर ‘रुसली माझ्या पोरांची माय’ ही त्यांची कॅसेटही प्रचंड गाजली. तर ‘तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे…’ या कॅसेटने त्यांना घराघरात पोहोचविले. नाव, पैसा सर्व काही या कॅसेटमुळे मिळाले.

अरे, दिवाने इश्क के जहाँ में लोग होते है, हमारे लोगों ने दिवानगी न पहचानी, हम तो आशिक है, भीमजी के नाम पर मरते है, मुझे दुनिया कहे पागल, मै भीम का दिवाना हूँ…

‘तुझ्या रक्तामधील भीमराव पाहिजे’ या कॅसेटमधील राहुल यांचं हे गाणं प्रचंड गाजलं. त्या आधी आनंद शिंदे यांच्या आवाजातही हे गाणं लोकप्रिय झालं होतं. परंतु, रसिकांनी राहुल यांच्या आवाजातील या गाण्यालाही तितकीच दाद दिली. राहुल यांनी आनंद-मिलिंद शिंदेंना गुरु मानलं होतं. त्यांच्यावर या दोघांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे राहुल यांची राहणीमान, केशभुषा सबकुछ आनंद-मिलिंद टाईप आहे.

संकटमोचक आनंद-मिलिंद

पुण्यात जयंतीनिमित्ताने त्यांचा प्रसिद्ध गायिका चंद्रभागा गायकवाड यांच्यासोबत कव्वालीचा सामना होता. त्यामुळे राहुल शिंदे यांना धडकी भरली. एवढ्या मोठ्या गायिकेसमोर आपला निभाव कसा लागेल? या प्रश्नाने ते गर्भगळीत झाले. तेव्हा त्यांनी आनंद शिंदे यांना मदतीसाठी फोन केला. आनंद शिंदे यांचा खडकीला अॅम्युनेशन फॅक्ट्रीजवळ कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमाची जराही पर्वा न करता आनंद यांनी कवी चंद्रकांत निरभवणे यांना राहुल यांच्या मदतीसाठी पाठविले. इकडे सामना सुरू झाला. चंद्रभागा गायकवाड यांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. डबल मिनिंगच्या गाण्यांमुळे राहुल टेन्शनमध्ये आले. तेवढ्यात निरभवणे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यामुळे राहुल यांचा जीव भांड्यात पडला. अन् निरभवणे यांना पाहून चंद्रभागा गायकवाड यांनी ही थेट गाण्याचा ट्रॅक बदलत भीमगीते सुरू केली. कधीही कोणतंही संकट आलं की ते थेट आनंद-मिलिंद यांचा धावा करतात. आनंद-मिलिंद हे त्यांच्यासाठी संकटमोचकच आहेत.

पुण्याचा राघू

आनंद शिंदे यांची जशी ‘नवीन पोपट’ म्हणून ओळख आहे. तशीच राहुल यांची ‘पुण्याचा राघू’ म्हणून ओळख आहे. पुण्याचा राघू या कॅसेटममुळे त्यांची ही ओळख निर्माण झाली आहे.

गाजलेली गाणी

रुसली माझी पोरांची माय, सांगा आता करावं काय…

आणि

लाखो जपणारे, पण एक झाले कुठे सांगा?, तुकडे चार करणारे… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about ‘punyacha raghu’ rahul shinde)

संबंधित बातम्या:

पुण्यातील भिंती रंगवल्या, आंदोलने, राडेही केले, आज गायक म्हणून लोकप्रिय!; वाचा, राहुल शिंदेंचे किस्से

सेटवर गाण्याचं पेमेंट घ्यायला गेले, निळूभाऊंनी थेट सिनेमात कामच दिलं; वाचा, पुणेकरांचा अफलातून किस्सा

‘या’ पाच गाण्यांनी ज्ञानेश पुणेकर घराघरात पोहोचले, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

(know about ‘punyacha raghu’ rahul shinde)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.