Adipurush Box Office | आदिपुरुषची 16 व्या दिवशीच बाॅक्स ऑफिसवर हवा गुल, मोठा फटका बसणार, चित्रपट फ्लाॅप?

आदिपुरुष चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होताना दिसत नाहीये. कोर्टाने देखील आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले आहे. लोकांना चित्रपटाच्या डाॅयलाॅगवर मोठा आक्षेप असल्याचे देखील बघायला मिळतंय.

Adipurush Box Office | आदिपुरुषची 16 व्या दिवशीच बाॅक्स ऑफिसवर हवा गुल, मोठा फटका बसणार, चित्रपट फ्लाॅप?
Adipurush
| Updated on: Jul 02, 2023 | 3:12 PM

मुंबई : आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात अडकलाय. इतकेच नाही तर न्यायालयाने देखील आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाच्या निर्मात्यांना खडेबोल सुनावले आहेत. आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होताना दिसत नाहीये. सतत चित्रपट निर्मात्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता आदिपुरुष चित्रपटाला (Movie) रिलीज होऊन तब्बल दोन आठवडे झाले आहेत. मात्र, सुरूवातीला चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले. परंतू आता प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आदिपुरुष चित्रपटातील काही डाॅयलाॅगवर (Dialogue) लोकांनी आक्षेप घेतला. त्यानतंर हे सर्व प्रकरण थेट न्यायालयामध्ये गेले.

आता आदिपुरुष चित्रपटाला रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचे कलेक्शन 300 कोटींच्या आसपास झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. सुरूवातीला 200 कोटींची कलेक्शन चित्रपटाने लवकर केले.मात्र, त्यानंतर चित्रपटाची कमाई मंदावली. आदिपुरुष हा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे.

आदिपुरुष चित्रपट 500 कोटींचा चित्रपट आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट काही धमाका करू शकले हे सांगणे थोडे अवघडच ठरणार आहे. कारण चित्रपटावर सतत टिका होताना दिसत आहे. न्यायालयाने देखील चित्रपट निर्मात्यांना फटकारले आहे. काही बदल हे चित्रपटामध्ये करण्यात आल्याचे सांगितले जातंय.

15 व्या दिवशी आदिपुरुष चित्रपटाने 1.17 कोटी आणि 16 व्या दिवशी 1 कोटींचे कलेक्शन केले आहे. म्हणजेच आता आदिपुरुष चित्रपट फ्लाॅप होण्याची दाट शक्यता आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे. प्रभासच्या अभिनयाचे काैतुक केले जात आहे. मात्र, चित्रपटातील डाॅयलाॅगवर लोकांचा आक्षेप आहे.

आदिपुरुष चित्रपटामध्ये सैफ अली खान हा देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. मात्र, आदिपुरुष चित्रपटाचे अजिबातच प्रमोशन करताना सैफ अली खान हा दिसला नाही. सैफ अली खान हा प्रमोशनापासून दूर होता. कारण आदिपुरुष चित्रपटातील त्याच्या लूकही खिल्ली सातत्याने उडवली जात होती. आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना कोणताही वाद हवा नसल्याने त्यांनी सैफला प्रमोशनपासून दूर ठेवले.