11 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात, खान कुटुंबाची सून आणि आता ‘ही’ अभिनेत्री जगत आहे असे आयुष्य…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

11 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात, खान कुटुंबाची सून आणि आता ही अभिनेत्री जगत आहे असे आयुष्य...
Malaika Arora
| Updated on: Oct 22, 2024 | 1:36 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायकाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका सोशल मीडियावरही सक्रिय आहे. मलायका अरोराचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलेले आहे. अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये मलायकाने घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने आपल्यापेक्षा 11 वर्ष लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरूवात केली. अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांनी मलायकावर जोरदार टीका केली. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक मुलगा असून अरहान खान त्याचे नाव आहे. अरहान खान हा अरबाज खान किंवा मलायकासोबत राहत नसून तो विदेशात शिक्षण घेत आहे.

लवकरच अरहान खान हा बॉलिवूडमध्ये पर्दापण करू शकतो. लेकाच्या बॉलिवूड पर्दापणाबद्दल स्वत: अरबाज खान याने खुलासा काही दिवसांपूर्वीच केला. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे कायमच एकमेकांसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. विदेशातही बऱ्याचदा खास वेळ घालवताना दिसले.

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. तशाप्रकारच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. मात्र, मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप नेमक्या कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाही.

ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका ही सतत विदेशात जाताना दिसली. मात्र, त्यावेळी अर्जुन कपूर हा तिच्यासोबत नव्हता. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी मलायका हिच्यासोबत अर्जुन कपूर दिसला. तिच्या वाईट काळात तिच्यासोबत उभा अर्जुन कपूर हा नक्कीच होता. 23 ऑक्टोबर 2024 रोजी मलायका अरोराचा वाढदिवस आहे.

मलायका अरोरा 23 ऑक्टोबरला 51 वर्षांची होईल. मलायका अरोरा जरी 50 वर्षांची असली तरीही बोल्डनेसमध्ये ती 21 वर्षाच्या मुलीला मागे टाकते. सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना मलायका अरोरा दिसते. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच मालदीवमधील अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.