AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्मोनल इंजेक्शनचा वापर, मैत्रिणीचा पती चोरल्याचा आरोप; अनेक कारणांमुळे वदाच्या भोवऱ्यात अडकली प्रसिद्ध अभिनेत्री

‘कोई मिल गया’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री अनेकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... कधी हार्मोनल इंजेक्शनचा वापर, तर कही मैत्रिणीचा पती चोरल्याचा आरोप...

हार्मोनल इंजेक्शनचा वापर, मैत्रिणीचा पती चोरल्याचा आरोप; अनेक कारणांमुळे वदाच्या भोवऱ्यात अडकली प्रसिद्ध अभिनेत्री
| Updated on: Aug 09, 2023 | 12:34 PM
Share

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या कामामुळे नाही तर, अनेकदा वादग्रस्त परिस्थितीमुळे चर्चेत आल्या. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काही अभिनेत्रींना स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली, पण त्यांना स्वतःची ओळख मात्र निर्माण करता आली नाही. ‘कोई मिल गया’ सिनेमात अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने उत्तम भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यानंतर वयाच्या १६ वर्षी हंसिका हिने प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया याच्यासोबत ‘आप का सुरूर’ सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेत्रीला लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही.

‘आप का सुरूर’ सिनेमात झळकल्यानंतर काही चाहत्यांनी अभिनेत्रीला डोक्यावर घेतलं, तर काही लोकांनी मात्र अभिनेत्रीवर निशाणा साधला… ‘आप का सुरूर’ सिनेमात मुख्य भूमिकेतून चाहत्यांच्या समोर आल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीवर हार्मोनल इंजेक्शनचा वापर केल्याचा आरोप लावला. पण अभिनेत्री सर्व आरोप फेटाळले होते. ‘आप का सुरूर’ सिनेमा २००७ साली प्रदर्शित झाला होता.

फक्त सिनेमांमुळेच नाही तर, अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत आली. हंसिका हिने ४ डिसेंबर २०२२ मध्ये बॉयफ्रेंड सोहेल कथुरिया याच्यासोबत लग्न केलं. सोहेल आणि हंसिका यांनी जयपूर याठिकाणी मोठ्या थाटात लग्न केलं. पण लग्नानंतर हंसिका हिच्यावर मैत्रिणीचा पती चोरल्याचा देखील आरोप लावला..

हंसिका हिने खास मैत्रीण रिंकी बजाज हिच्या पहिल्या पतीसोबत लग्न केल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीवर मैत्रिणीचा पती चोरल्याचा आरोप लावला. पण हंसिका आणि सोहेल यांनी कधीही या प्रकरणावर अद्यापही मौन बाळगलं आहे. आता हंसिका हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, हंसिका तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोमध्ये अभिनेत्री साध्वीच्या वेषात स्मोकिंग करताना दिसली होती. ज्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी अभिनेत्रीवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोपही केला. यानंतर हंसिकाचे असे काही फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तिने बिकिनी घातली होती. अशा अनेक कारणांमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.