Kriti Prabhas: ‘हे प्रेम नाही तर..’; अखेर प्रभासशी लग्न करण्याच्या चर्चांवर क्रितीने सोडलं मौन

'बाहुबली' प्रभासचं क्रिती सनॉनवर जडलं प्रेम? अभिनेत्रीनेच सांगितलं लग्नाच्या चर्चांमागील सत्य

Kriti Prabhas: हे प्रेम नाही तर..; अखेर प्रभासशी लग्न करण्याच्या चर्चांवर क्रितीने सोडलं मौन
Prabhas and Kriti Sanon
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 30, 2022 | 9:20 AM

मुंबई: ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रभासने क्रितीला प्रपोज केलं असून हे दोघं लवकरच साखरपुडा करणार आहेत, अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. या चर्चांवर अखेर क्रितीने मौन सोडलं आहे. क्रिती आणि प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे प्रमोशनसाठी हा अजब फंडा असल्याचं काहीजण म्हणत आहेत. तर दुसरीकडे याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचंही म्हटलं जात आहे.

साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान क्रितीने मंगळवारी रात्री इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली. या स्टोरीमध्ये तिने प्रभाससोबतच्या नात्याबद्दल मौन सोडलंय.

काय आहे क्रितीची पोस्ट?

‘हे प्रेमही ना आणि पीआरसुद्धा (प्रसिद्धीसाठी) नाही.. आमचा ‘भेडिया’ एका रिॲलिटी शोमध्ये थोडा जास्तच वाइल्ड झाला होता. त्याने केलेल्या मस्करीमुळे अशा हास्यास्पद चर्चांना सुरुवात झाली’, असं तिने लिहिलं.

लग्नाच्या चर्चांवर तिने पुढे म्हटलं, ‘काही वेबसाइट्स माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधी मी चर्चांचा हा फुगा फोडते. या चर्चा तथ्यहीन आहेत.’ यामध्ये तिने ‘फेक न्यूज’ अशी स्टीकरसुद्धा पोस्ट केली आहे.

क्रिती आणि वरुण धवन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या दोघांनी झलक दिखला जा 10 या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये बोलताना वरुणने क्रितीच्या रिलेशनशिपबद्दल मस्करी केली.

शोचा परीक्षक आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने वरुणला हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील काही सिंगल एलिजिबल महिलांची नावं जाहीर करण्यास सांगितली. त्यावेळी वरुणने क्रितीचं नाव घेणं टाळलं. साहजिकच करणने पुढे याविषयी प्रश्न विचारला.

करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना वरुण म्हणाला होता, “क्रितीचं नाव यासाठी नव्हतं कारण तिचं नाव आधीच कोणाच्या तरी हृदयात आहे. एक व्यक्ती आहे जी मुंबईत नाही, ती सध्या दीपिका पदुकोणसोबत शूटिंग करतेय.” हे ऐकून क्रितीसुद्धा आश्चर्यचकीत झाली होती.

प्रभास सध्या दीपिका पदुकोणसोबत ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचं शूटिंग करतोय. यामध्ये अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. एका मुलाखतीदरम्यानही क्रितीला प्रभासबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, “मला संधी मिळाल्यास मी त्याच्याशी लग्न करेन.” तिच्या या विधानानंतर या दोघांची सोशल मीडियावर अधिक चर्चा होऊ लागली.