कुमार सानू यांनी कितीवेळा केलं लग्न, किती मुलांचे आहेत वडील? त्यांच्या खासगी आयुष्य सर्वत्र चर्चेत

Kumar Sanu Personal Life: बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना त्यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. आज त्यांचे लग्न आणि मुलांबद्दल मोठी माहिती जाणून घेवू...

कुमार सानू यांनी कितीवेळा केलं लग्न, किती मुलांचे आहेत वडील? त्यांच्या खासगी आयुष्य सर्वत्र चर्चेत
फाईल फोटो
| Updated on: Sep 18, 2025 | 12:26 PM

Kumar Sanu Personal Life: बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय गायक कुमार सानू यांनी 90 च्या दशकात बॉलिवूडला अनेक हीट गाणी दिलीत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ सिनेमात त्यांनी गायिलेल्या गाण्यामुळे कुमार सानू एका रात्रीत स्टार झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. प्रोफेशनल आयुष्यात कुमार सानू यशाच्या शिखरावर चढले, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक संटकांचा सामना केला. अफेअर्स आणि वैवाहिक आयुष्यामुळे कुमार सानू यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली.

कोलकातामध्ये जन्मलेले केदारनाथ भट्टाचार्य, ज्यांना कुमार सानू म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनी त्यांच्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना मोहित केलं. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी असंख्य सुपरहिट सिनेमांसाठी गाणी गायली आहेत, जी गाणी आजही लोकांच्या हृदयात कोरली गेली आहेत.

कुमार सानू यांनी अनेक हीट गाणी दिली. पण ते खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिले. सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 19’ स्पर्धक आणि अभिनेत्री कुनिका सदानंद हिने काही दिवसांपूर्वी कुमार सानू यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला. ज्यामुळे कुमार सानू त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

कुमार सानू यांनी 2 लग्न केली. रिपोर्टनुसार, 1980 मध्ये त्यांनी रीटा भट्टाचार्य यांच्यासोबत लग्न केलं. रीटा आणि कुमार सानू यांना तीन मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावे जिको, जस्सी आणि जान कुमार सानू अशी आहेत… गायकाचा तिसरा मुलगा जान कुमार हा ‘बिग बॉस 14’ मध्ये देखील होता.

गायकाच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 1994 मध्ये रीटा आणि कुमार सानू यांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर कुमार सानू यांचं नाव अभिनेत्री मिनाक्षी शेषार्दी हिच्यासोबत जोडण्यात आलं. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… असं देखील कुमार सानू म्हणाले. एवढंच नाहीतर, गायक त्यांच्या पहिल्या लग्नात आनंदी नव्हते असा खुलासा अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी केला.

कुनिका सदानंद यांच्या वक्तव्यानुसार, उटीमध्ये पहिल्यांदा गायकाला भेटली तेव्हा कुमार सानू दारू पिऊन रडू लागले. कुनिका सदानंदचं कुमार सानूसोबत वर्षानुवर्षे प्रेमसंबंध होते आणि दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

कुमार सानू यांचं दुसरं लग्न

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर कुमार सानू यांनी दुसरं लग्न सलोनी भट्टाचार्यसोबत केलं. 2001 मध्ये कुमार सानू यांनी दुसरं लग्न केलं. आता दोघांच्या लग्नाला 2024 वर्ष झाली आहेत. लग्नानंतर त्यांनी दोन मुलींना जन्म दिला. त्यांनी पहिल्या मुलीला दत्तक घेतलं आहे. त्यांची पहिली मुलगी देखील वडिलांप्रमाणे गायक आहे आणि ती स्टेज शो करते. दुसऱ्या कुटुंबासोबत कुमार सानू आनंदी आयुष्य जगत आहेत.