
Bigg Boss 19 Update: अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. टीव्ही आणि जियो हॉटस्टारवर शो प्रसारित होणार आहे. शो कधी प्रेक्षकांच्या भेटीस येईल अद्याप कळलेलं नाही. पण शोचे महत्त्वाचे अपडेट मात्र हळू-हळू समोर यायला लागले आहेत. सलमान खान याने ‘बिग बॉस 19’ साठी प्रोमो शूट केला अशी माहिती समोर आली. आता शोबद्दल नवीन अपडेट समोर आलं आहे. शोमध्ये ‘बिग बॉस चाहते हैं…’ हा डायलॉग आता प्रेक्षकांना ऐकू येणार नाही. तर शोमध्ये 2 थीम असून महत्त्वाचे 5 बदल यंदाच्या सीझनमध्ये करण्यात आले आहेत.
‘बिग बॉस 19’ च्या ताज्या रिपोर्टनुसार, बिग बॉस में बदल जाएगा फेमस डायलॉग बदलणार आहे. यावेळी ‘बिग बॉस 19’ च्या स्वरूपात मोठा बदल होणार आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे या सीझनमध्ये ‘बिग बॉस चाहते हैं’ ऐकायला मिळणार नाही. त्याऐवजी ‘बिग बॉस जानता चाहते हैं’ ऐकायला मिळेल.
रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, सलमान खानच्या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांना घरकामात पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल. म्हणजेच घर चालवण्याची जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकांवर असेल. रेशन ठरवण्यापासून ते कोण कोणतं काम करेल यापर्यंत, सर्व काही स्पर्धक ठरवतील. बिग बॉस यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.
बिग बॉसच्या प्रत्येक सीझनची थीम दरवेळी वेगळी असते. नवीन सीझनमध्ये, निर्माते दोन थीम घेऊन परतत आहेत. हे थोडं विचित्र वाटेल पण खूप मजेदार असणार आहे. ‘बिग बॉस 19’ ची पहिली थीम राजकीय असेल आणि दुसरी थीम रिबाउंड असेल.
बिग बॉसच्या नवीन अपडेटमध्ये असे म्हटलं आहे की, यावेळी बिग बॉस 19 मध्ये दोन थीम असतील आणि त्यानुसार सेलिब्रिटींनाही संपर्क साधला जात आहे. देशातील मोठ्या मुद्द्यांशी जोडल्या गेलेल्या सेलिब्रिटींनाच या शोमध्ये आमंत्रित केलं जाईल. उदाहरणार्थ, इंडियाज गॉट टॅलेंटच्या वादामुळे अपूर्व मुखिजाशी संपर्क साधण्यात आला आहे.
शोची सर्वांत महत्त्वाची अपडेट म्हणजे शोमध्ये तीन सेलिब्रिटी शो होस्ट करणार आहे. याआधी अनेक शो एकट्या सलमान खान याने होस्ट केले आहेत. करण जौहर, फराह खान आणि अनिल कपूर देखील शो होस्ट करतील असं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या महितीनुसार, शोच्या सेटचं काम 20 ऑगस्टपर्यंत पुर्ण होईल. 28 ऑगस्ट रोजी सलमान खान याच्या भागाची शूटिंग होईल. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी स्पर्धकांच्या डांस परफॉर्मेंस शूटिंग होईल…