Multibagger Stock: तांब्याच्या या शेअरमुळे सोन्यासारखा परतावा, गुंतवणूकदारांनी कमाईचा ठोकला तंबू
Multibagger Stock: सध्या सोने-चांदीची सगळीकडं चर्चा आहे. सोन्याची दोन लाखांची घोडदौड सुरू आहे. तर चांदीने चार लाखांचा टप्पा गाठला आहे. पण या दोघांच्या स्पर्धेत तांबे डार्क हॉर्स ठरले आहे. अनेक गुंतवणूकदारांनी आता तांब्याकडे मोर्चा वळवला आहे. शेअर बाजारात या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Hindustan Copper Share: सध्या सोने आणि चांदीला महागाईचे पंख लागले आहे. दिवसागणिक दोन्ही धातुच्या किंमतीत तुफान येत आहे. रोज एक नवीन रेकॉर्ड नवीन दिवसाच्या स्वागताला हजर होतो. पण इकडे ग्राहकांच्या जीवाला घोर लागलेला आहे. तर गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. तांबे या स्पर्धेत डार्क हॉर्स ठरले आहे. अनेक गुंतवणूकदारांनी आता तांब्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यात शेअर बाजारात हिंदुस्थान कॉपर कंपनीच्या शेअरने मोठा परतावा दिला आहे. आज हा शेअर 19 टक्क्यांनी उसळला. तर गेल्या सहा महिन्यात हा शेअर 192 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
हिंदुस्थान कॉपरची मोठी खेळी
हिंदुस्थान कॉपर या कंपनीच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला. बाजारात पडझडीचे सत्र सुरू असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. तर दुसरीकडे बाजारात या शेअरने तुफान खेळी खेळली. हा शेअर एनएसईवर आज 756.20 रुपयांवर ट्रेड करत होता. हा शेअर आज दिवसभरात 19.39 टक्क्यांनी उसळला. तर बीएसईवर हा शेअर आज 755.55 रुपयांवर ट्रेड करत होता. आज या शेअरने बीएसईवर पण मोठी झेप घेतली. हा शेअर 19.28 टक्क्यांसह 122.15 रुपयांनी वधारला. गुंतवणूकदारांना एकाच दिवशी लॉटरी लागली. त्यांची तुफान कमाई झाली. हा शेअर अजून किती मोठी घोडदौड करतो हे बजेटनंतर समोर येईल. पण सरकारी कंपन्यांच्या शेअरकडे सध्या बजेटमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
हिंदुस्थान कॉपर शेअरने बाजारात आज तुफान खेळी खेळली. त्यामुळे किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचे डोळे विस्फारले. आज स्ट्रॉग व्हॅल्यूमची लाट दिसली. आज बीएसई वर जवळपास 89.58 लाख शेअरची हाताळणी झाली. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी हालचाल दिसून आली. सरासरी ट्रेड व्हॅल्यूमपेक्षा यावेळी चारवेळा अधिकने शेअर उसळला. एका दिवसाच्या उच्चांकातही या शेअरने मोठी झेप घेतली. हा शेअर 760.05 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. गेल्या दहा महिन्यातील या शेअरची धावपळ लक्षवेधी आहे. हा शेअर 305 रुपयांनी वधारला.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
