लक्ष्मीकांत बेर्डेंची ही इच्छा आजही अपूर्णच; वर्षा उसगावकर म्हणाल्या “त्याची ती इच्छा मरेपर्यंत पूर्ण झाली नाही”,

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत राज्य करणारा अभिनेता. ज्यांचं नाव आजहीस लोकांच्या तोंडी त्याच आपुलकीने निघतं. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांचं भरभरून मनोरंजन केलं. पण त्यांची एक इच्छा मात्र अजूनही अपूर्णच राहिली आहे. ज्याबद्दल वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

लक्ष्मीकांत बेर्डेंची ही इच्छा आजही अपूर्णच; वर्षा उसगावकर म्हणाल्या त्याची ती इच्छा मरेपर्यंत पूर्ण झाली नाही,
Laxmikant Berde unfulfilled wish, an untold story revealed by Vrushali Usgaonkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2025 | 2:11 PM

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत राज्य करणारा अभिनेता. लक्ष्मीकांत बैर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम मात्र प्रेक्षकांच्या मनात आहे.आजही लोक त्यांची आठवण काढतात. फक्त प्रेक्षकच नाही तर मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी देखील त्यांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही.

असात एक प्रसंग अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे या अभिनेत्यांचा समावेश आहे. अलिकडेच मुलाखतीत वर्षा यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढत त्यांच्या मनातली त्या इच्छेबद्दल सांगितलं जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली ती खंत कोणती?

वर्षा उसगावकर यांनी मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनातली ती खंतही बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की, “आज लक्ष्या असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता असे मला वाटते. त्याचे अकाली निधन झाले असे मी म्हणेन. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट केला होता. त्याआधी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे कॉमेडी, कॉमेडी आणि फक्त कॉमेडी असे समजले जायचे. लक्ष्याला तीच खंत होती की माझा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना दिसला पाहिजे. जेव्हा दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी लक्ष्मीकांतला हा चित्रपट दिला, तेव्हा त्याने लगेच मला फोन केला. तो म्हणाला की, या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. कदाचित तुला मानधन कमी देतील. हा चित्रपट स्त्रीप्रधान नसेल, पण तू हा चित्रपट करावा अशी माझी इच्छा आहे.”

त्यावेळी त्याला खूप वाईट वाटलं

त्या पुढे म्हणाल्या की, “लक्ष्याने ज्या पद्धतीने त्यात काम केलंय, ते मला खूप ‘टचिंग’ वाटलं. त्याचे सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्ष्या मला तिथे दिसला. त्या चित्रपटासाठी लक्ष्मीकांतला पुरस्कार मिळायलाच हवा होता. मला असं वाटलं की त्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला होता. पण त्या वर्षीचा पुरस्कार त्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कायमच ती खंत वाटत राहिली की, या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. ते जर त्याला मिळालं असतं, तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता.”

असं म्हणत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची ती अपूर्ण राहिलेली इच्छा बोलून दाखवली. एवढंच नाही तर त्यांनी स्वत: देखील त्याबद्दल भावना व्यक्त केल्या आणि खंतही. पण लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे इंडस्ट्रीतील एक असं रसायन आहे जे कधीच कोणी विसरू शकत नाही.