
मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | आयुष्य सुंदर, आपल्या मनासारखं असावं… असं प्रत्येकाला वाटतं… पण प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतच असतात. ज्यामुळे मन खचतं… झगमगत्या विश्वात देखील अशा आयुष्याचा सामना अनेक सेलिब्रिटींनी केला आहे. झगमगत्या विश्वात पदार्पण करत अनेक अभिनेत्रींनी स्वतःची ओळख निर्माण केली. प्रसिद्धी मिळवली… एवढंच नाही तर, गडगंज संपत्ती देखील कमावली. पण तरी देखील अभिनेत्रींना खासगी आयुष्याचा आनंद घेता आला नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली. अशात अभिनेत्रींनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. आता देखील अशा अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जिने आयु्ष्यात स्वतःचं नाव मोठं केलं, पण वैवाहिक आयुष्यात मात्र तिला चढ – उतारांचा सामना करावा लागला…
अभिनेत्रीने फार कमी वयात फिल्मी करियरची सुरुवात केली. अभिनेत्रीची लोकप्रियता गगनाला भिडली होती. अभिनेत्रीने तमिळ, तेलगू आणि काही मल्याळम सिनेमां शिवाय तिने हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. आपल्या अभिनयाने अभिनेत्रीने असंख्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने तब्बल १७ वर्ष अभिनय क्षेत्रात काम केलं.
अभिनेत्री १७ वर्ष अभिनय विश्व गाजवलं. तब्बल ४५० सिनेमांमध्ये अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकली. प्रोफेशनल आयुष्यात तिला भरभरुन यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अभिनेत्री स्वतःचं शिक्षण देखील पूर्ण करता आलं नाही. म्हणून वयाच्या १४ वर्ष कुटुंबियांनी अभिनेत्री लग्न लावून दिलं.
वयाच्या १४ व्या लग्न झाल्यानंतर अभिनेत्री तिच्या आयुष्यात आनंदी नव्हती. अभिनेत्रीला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. अखेर कंटाळलेल्या अभिनेत्री पतीचं घर सोडलं. पतीचं घर सोडल्यानंतर अभिनेत्रीला काही वर्षांनंतर सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर अभिनेत्री मागे वळून पाहिलं नाही आणि एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं.
पतीचे घर सोडल्यानंतर अभिनेत्रीला दिग्दर्शक अँथनी ईस्टमन यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे अभिनेत्रीचं नशीब चमकलं. अभिनेत्रीने दाक्षिणात्या सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. मोहनलाल यांच्याशिवाय कमल हसन यांच्यासोबत देखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकली… पण हे सुख अभिनेत्री जास्त काळ अनुभवू शकली नाही…
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सिल्क स्मिता (Silk Smitha) आहे. जिचं खरं नाव विजयलक्ष्मी होतं. पण तिला सिल्क या नावानेच ओळखलं जातं. अभिनेत्री स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पैसा आणि प्रसिद्धी कमावली…
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने एका डॉक्टरसोबत लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नात देखील अभिनेत्री आनंदी नव्हती. अखेर २३ सप्टेंबर १९९६ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना अभिनेत्रीने लिहिलेलं शेवटचं पत्र मिळालं. ज्यामध्ये अभिनेत्रीने मी माझ्या आयुष्यात आनंदी नाही.. असं लिहिलं होतं.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा देखील साकारण्यात आला. त्या सिनेमाचं नाव आहे ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture). सिनेमात अभिनेत्री विद्या बालन हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमासाठी अभिनेत्री विद्या बालन हिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं.