Kiss Controversy : साक्षी तन्वरसोबत 17 मिनिटांचा किसिंग सीन, Liplock वर काय होती राम कपूरच्या बायकोची प्रतिक्रिया

Kiss Controversy : 'बडे अच्छे लगते है' मालिकेत अभिनेत्री साक्षी तन्वरसोबत किसिंग सीन... 'त्या' 17 मिनिटांच्या Liplock नंतर सर्वत्र उडालेली खळबळ... त्यानंतर काय होती अभिनेते राम कपूर यांच्या बायकोची प्रतिक्रिया? 'लॉक अप 2' शोमध्ये अभिनेत्याकडून मोठा खुलासा.

Kiss Controversy : साक्षी तन्वरसोबत 17 मिनिटांचा किसिंग सीन, Liplock वर काय होती राम कपूरच्या बायकोची प्रतिक्रिया
| Updated on: Jun 30, 2026 | 1:32 PM

Kiss Controversy : अभिनेते राम कपूर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालीकेतील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण मालिकेतील एक सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. मालिकेत राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्यावर तब्बल 17 मिनिटांचा किसिंग सीन शूट करण्यात आलेला. दरम्यान, ‘लॉक अप 2’ शोमध्ये राम कपूर यांनी त्या सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शोमध्ये अश्नीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी ग्रोव्हर यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, त्यांनी त्या वादग्रस्त ‘लिप-लॉक’ सीनवर पत्नी गौतमी कपूर हिची काय प्रतिक्रिया होती, हे सांगितलं.

‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. टीव्हीवर पहिल्यांदा राम आणि साक्षी यांच्यातील किसिंग सीन दाखवण्यात आलेला. त्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. दरम्यान, ‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) च्या ताज्या भागात माधुरी ग्रोव्हर आणि राम कपूर यांच्यात या विषयावर चर्चा झाली. माधुरी म्हणाली की, पडद्यावर आपल्या पतीला इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहणे हे स्टार्सच्या पत्नींसाठी नक्कीच सोपं नसावं.

यावर राम कपूर म्हणाले, जेव्हा गौतमी कपूर हिला किसिंग सीनबद्दल कळलं तेव्हा बायकोने देखील अभिनेत्याचा सपोर्ट केला आणि म्हणाली, ‘पहिल्यांदा भारतीय टेलीव्हीजनवर असं काही होत आहे, त्यामुळे मला गर्व वाटत आहे… पुढे राम कपूर म्हणाले, ‘गौतमीला वाईट वाटलं नाही. एक कलाकार जेव्हा त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि सुरक्षित असल्याचं भासवतो… तेव्हा दोघांमध्ये एक वेगळं नातं निर्माण होतं.’

पण ज्या सहजतेने राम कपूर यांनी सांगितलं की, माझ्या बायकोला त्या किसिंग सीनमुळे कोणत्याच वेदना झाल्या नाहीत. पण तसं काहीही नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार, तेव्हा राम आणि गौतमी यांच्यामध्ये भांडणं झाली होती. पण वेळेनुसार दोघांच्या नात्यातील दुरावा देखील दूर झाला…, राम कपूर कायम पत्नी गौतमी हिच्यासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

Follow Us