AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhu Kambikar : गेल्या दहा वर्षांपासून…मधू कांबीकर यांची होती ‘ही’ शेवटची इच्छा, अभिनेत्रीच्या भाचीचा खुलासा

Madhu Kambikar Last Wish : मधू कांबीकर यांच्या भाचीनं मधू यांची शेवटची इच्छा सांगितली आहे. मधू गेल्या 10 वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या.

Madhu Kambikar : गेल्या दहा वर्षांपासून...मधू कांबीकर यांची होती 'ही' शेवटची इच्छा, अभिनेत्रीच्या भाचीचा खुलासा
| Updated on: Oct 14, 2026 | 3:47 PM
Share

मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मधू कांबीकर यांचं वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. मधू कांबीकर अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्या कुणालाही ओळखत नव्हत्या. मात्र, घुंगरूच्या आवाजानं हाताची हालचाल मात्र करायच्या. अशातच आता मधू कांबीकर यांची भाची कीर्ती वैरालकरनं मधू यांची शेवटची इच्छा सांगितली आहे. कीर्तीनं घुंगराचे फोटो शेअर करत मधू यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कीर्ती वैरालकरची पोस्ट

कीर्ती वैरालकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘अखेरचा निरोप…#मधू_कांबीकर…माझ्या सोबत माझे घुंगरू न विसरता द्याल…हो हेच सांगून ठेवलं होतं मधू मावशीने आणि आज तीचे घुंगरु कायमचे शांत झाले…सुप्रसिद्ध सिनेतारका, नाट्य कलावंत आणि उत्कृष्ट लावणी नृत्यागंणा मधू कांबीकर म्हणजेच माझी लाडकी मधू मावशीचं आज दुःखद निधन झालं. गेल्या दहा वर्षांपासून मावशी अंथरुणाला खिळून होती. यादरम्यान बरेचदा तिच्या घरी जाणं झालं. मावशीच्या रूममध्ये तिचा “सखी माझी लावणी” मधील स्टेजवरचा पायात घुंगरं बांधलेला नुसता पायांचा भला मोठा फोटो फ्रेम करुन लावलेला आहे.’

‘मावशीला कित्येकदा लावणी सादर करतांना देखील पाहिलंय. ही विजेसारखी तळपणारी कलावंत अशी पडून असलेली पाहून काळजाला पीळ पडायचा. पण आज मावशी त्या त्रासातूनही कायमची मुक्त झाली. पण जाताना ही माऊली तीचे घुंगरू मात्र सोबत घेऊन गेली. ज्या कलेने तिला महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली त्या कलेशी ती अखेरच्या श्वासा पर्यंत प्रामाणिक राहिली. प्रीतमने (मधू मावशीचा मुलगा) जेंव्हा माझ्या हातात घुंगरू दिले तेव्हा हुंदका दाटून आला.’

‘बाबाच्या कुशीत शिरून रडून घेतलं आणि मावशीच्या रूम मधल्या त्याच फोटोसमोर तिच्या सोबत जाणाऱ्या घुंगरांचा फोटो काढला. तिला मिळालेले विविध राष्ट्रीय पुरस्कार. वेगवेगळे मानपत्र तिच्या यशाची कहाणी सांगत होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधी सोबत ज्या बिजलीने फुगडी खेळली ती पावलं आज कायमची शांत झालीत. मावशी तुझा कलावंत म्हणून प्रवास थक्क करणारा तर आहेच. पण माणूस म्हणूनही तू अफाट व्यक्ती होतीस. आमच्या परिवाराशी तुझा स्नेह कोणत्याही रक्ताच्या नात्या पल्याडचा होता. बाबाची आणि तुझी ओळख तर माझ्या जन्मा अगोदरची…याच आठवणींना बाबाने श्रद्धांजली देतांना उजाळा दिला. खूप आठवणी मनात पिंगा घालतायेत. काय काय लिहू… प्रचंड कालवा कालव आहे मनात…आज दिवसभर तुझ्या भेटीला आलेला सगळा गोतावळा सोडून तू अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस. आता स्वर्गात रंभा आणि उर्वशीला तू जबरदस्त कॉम्प्लेक्स देणार यात मला तरी तिळमात्र शंका नाही. प्रचंड देखणं रूप आणि नृत्याची कमालीची जाणकार असलेली साक्षात हिरोईन आज स्वर्गात गेलीये. भावपुर्ण श्रद्धांजली मधू मावशी…तुझीच कीर्ती.’ असं कीर्ती यांनी शेवटी म्हटलं आहे.

Follow Us
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...