AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhu Kambikar: मधू कांबीकर यांना भामट्यांनी बंगल्यावर बोलावलं अन्…, दादा कोंडके यांच्यामुळे टळलेला मोठा अनर्थ

Madhu Kambikar: अभिनेत्री मधू कांबिकर यांनी अनेक मालिका आणी सिनेमांमध्ये काम केलं, पण एकदा तर भामट्यांनी त्यांना बंगल्यावर बोलावून त्यांच्या अपहरणाचा कट रचला... तेव्हा दादा कोंडके यांनी त्यांची मोठी मदत केली.

Madhu Kambikar: मधू कांबीकर यांना भामट्यांनी बंगल्यावर बोलावलं अन्..., दादा कोंडके यांच्यामुळे टळलेला मोठा अनर्थ
Madhu Kambikar
| Updated on: Oct 12, 2026 | 10:59 AM
Share

Madhu Kambikar: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःख कमी झालेलं नसताना ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. वयाच्या 73 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. एक काळ असा होता जेव्हा मधू कंबिकर यांच्यासोबक काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागलेली असायची. यात दरम्यान मधू कांबीकर यांच्यासोबत अशी एक घटना घडली, जी फार भयानक होती, मालिकेची ऑफर घेऊन आलेल्या तीन भामट्यांनी मधू कांबिकर यांच्या अपहरणाचा कट रचलेला.

रिपोर्टनुसार, मधू कांबीकर यांना अनेक मालिकांच्या ऑफर येत असताना त्यांनी ऑफर देणाऱ्यांना घरी बोलावले होतं. मालिकेची कथा ऐकल्यानंतर पुढील बोलणी करण्यासाठी त्यांना बंगल्यावर येण्यास सांगितलं. पण तेव्हा मधू यांना संशय आला की, काहीतरी अघटित होऊ शकतं. अशात त्यांनी मोठ्या हुशारीने त्या तीन भामट्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अभिनेते दादा कोंडके मधू यांच्या मदतीसाठी धावून आले.

भामट्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर मधू बसलेल्या. गाडी दादरच्या इथून जात असताना इथे माझी मैत्रीण राहते तिच्याकडून मला काहीतरी घ्यायचं आहे त्यामुळे दहा-पंधरा मिनिटे इथेच थांबा असं म्हणून त्या दादर येथील बंगल्यात गेल्या. ते दादा कोंडके यांचे घर होते. अशा प्रसंगात दादा कोंडकेच आपल्याला वाचवू शकतात असा विश्वास त्यांना होता आणि मधू यांचा विश्वास खरा ठरला. दादा यांनी मधू यांनी भमट्यांच्या तावडीतून सुटका केली.

दादा यांनी मधू यांचं सांगणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी धीर दिला. त्यानंतर त्या तिघांना मैत्रिणीने चहासाठी बोलावलं आहे. तिघांना देखील ते खरं वाटलं आणि ते चहासाठी गाडीतून खाली उतरले. पण दादा कोंडके यांनी त्यांच्या अंगरक्षकांना दारात उभं केलं होतं… अंगरक्षकांनी तिघांना प्रचंड मारलं, दादा कोंडके यांनी देखील त्यांच्या स्टाईलने भामट्यांना खडे बोल सुनावले.

अशात तिघांनी देखील कबूल केलं की, मालिकेची कोणतीच ऑफर नाही… यांच्या तोंडून हे ऐकताच मधु कोंबडीकर यांना देखील मोठा धक्का बसला. आता आपण भामट्यांच्या तावडीत अडकले असतो तर, मोठा अनर्थ घडला असता… पण दादा कोंडके यांच्यामुळे मोठी घटना टळली… सांगायचं झालं तर, दादा कोंडके आणि मधू कांबिकर यांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे.

Follow Us
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...